‘गडहिंग्लज’ला दशकानंतर मान!

By Admin | Published: May 22, 2015 11:39 PM2015-05-22T23:39:17+5:302015-05-23T00:27:57+5:30

जिल्हा बँक : अप्पी पाटील ठरले सहावे उपाध्यक्ष

After a decade of 'Gadhinglaj'! | ‘गडहिंग्लज’ला दशकानंतर मान!

‘गडहिंग्लज’ला दशकानंतर मान!

googlenewsNext

राम मगदूम - गडहिंग्लज --५० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा राहिलेल्या गडहिंग्लज तालुक्याला तब्बल १० वर्षांनंतर जिल्हा बँकेत मानाचे स्थान मिळाले आहे. बँकेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले विनायक उर्फ अप्पी पाटील हे तालुक्यातून झालेले सहावे उपाध्यक्ष ठरले आहेत.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व गडहिंग्लजचे माजी आमदार स्व. बी. एस. पाटील-गिजवणेकर, स्व. डॉ. आर. एस. संकपाळ-दुंडगेकर आणि टी. आर. पाटील-कडलगेकर यांना बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला.
दरम्यान, स्व. डॉ. संकपाळ, स्व. शिवाजीराव पाटील-भडगावकर, स्व. राजकुमार हत्तरकी, टी. आर. व भैयासाहेब कुपेकर यांना बँकेच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यांच्यानंतर हा मान अप्पींना मिळाला आहे. उपाध्यक्षपदानंतर डॉ. संकपाळ व टी.आर.ना अध्यक्षपदाचाही बहुमान मिळाला.
स्वातंत्र्यपूर्व काळातील जिल्ह्याचे नेते स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे कट्टर अनुयायी बी. एस. पाटील, डॉ. संकपाळ व शिवाजीराव पाटील ही मंडळी तालुक्यात नेतृत्व करीत होते. रत्नाप्पाण्णांमुळेच त्यांना जिल्हा बँकेचा पदाधिकारी होण्याचा मान मिळाला. त्यानंतर स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्यामुळे टी. आर. पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. मात्र, जिल्ह्यात कुणीही गॉडफादर नसतानादेखील अप्पी पाटील यांनी बँकेच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे.

सर्वपक्षीय ‘अप्पी’
पूर्वीपासून काँगे्रसप्रेमी राहिलेल्या महागावच्या वतनदार पाटील घराण्यात अप्पींचा जन्म झाला. सरपंचपदापासून जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. गडहिंग्लज कारखान्यात ते जनसुराज्यकडून संचालक आहेत. जिल्हा परिषदेत ते राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. आता काँगे्रसतर्फे ते जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष झाले आहेत.


यांना मिळाला अध्यक्षपदाचा मान
बी.एस.पाटील- २१ मार्च १९६७ ते ८ मार्च १९६९
आर. एस. संकपाळ- ११ मार्च १९८२ ते ११ मार्च १९८३
टी. आर. पाटील- ९ डिसेंबर २००६ ते २२ नोव्हेंबर २००७


यांना मिळाली उपाध्यक्षपदाची संधी
आर. एस. संकपाळ- १९७१ ते १९७२
शिवाजीराव पाटील- १९८४ ते १९८५
राजकुमार हत्तरकी- २००० ते २००१
टी. आर. पाटील- २००१ ते २००२
भैयासाहेब कुपेकर - २००३ ते २००४
अप्पी पाटील - २०१५

Web Title: After a decade of 'Gadhinglaj'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.