प्रदर्शनानंतरही 'ए दिल...' ची मुश्किल कायम

By admin | Published: October 28, 2016 09:38 AM2016-10-28T09:38:39+5:302016-10-28T13:50:20+5:30

दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा सिनेमा 'ए दिल...'ची प्रदर्शनानंतरही मुश्किल कायम आहे. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला असला तरी देशभरात विविध संघटनांकडून सिनेमाविरोधात निदर्शनं सुरू आहेत.

After the display 'A heart ...' also made it difficult | प्रदर्शनानंतरही 'ए दिल...' ची मुश्किल कायम

प्रदर्शनानंतरही 'ए दिल...' ची मुश्किल कायम

Next
ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 28 - दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा सिनेमा 'ए दिल...'ची मुश्किल प्रदर्शनानंतरही कायम आहे. पाकिस्तानी कलाकार फवाद खान याच्या सिनेमातील सहभागामुळे 'ए दिल है मुश्किल' सिनेमा वादात अडकला होता. आज हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला असला तरी देशभरात विविध संघटनांकडून सिनेमाविरोधात निदर्शनं सुरू आहेत. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 
 
 
 
कल्याणमधील सर्वोदय मॉलमध्ये संभाजी ब्रिगेडने 'ए दिल है मुश्किल' सिनेमाविरोधात निदर्शनं केली.  संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सिनेमाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजीदेखील केली. 

कोल्हापूरमधील राजारामपुरी परिसरातील पार्वती मल्टिप्लेक्सबाहेर पतित पावन संघटनेनंही सिनेमाविरोधात जोरदार निदर्शनं केली. जोरदार निदर्शनांमुळे सिनेमागृहाने 'ए दिल है मुश्किल'चा खेळ बंद केला.

बिहारमध्येही सिनेमागृहांबाहेर काही संघटनांनी निषेध व्यक्त करत दिग्दर्शक-निर्माता करण जोहर आणि 'ए दिल है मुश्किल' सिनेमाचे पोस्टर जाळले.
नवी दिल्लीतील सिनेमागृहांबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर केलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत 38 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधी वातावरण तापले व पाकच्या कुरापती थांबेपर्यंत कोणताही पाकिस्तानी खेळाडू, कलाकार, अभिनेता यांना भारतात प्रवेश देऊ नये, तसेच त्यांच्यासोबत कोणीही काम करू नये अशी भूमिका राजकीय पक्षांनी मांडली. 
आणखी बातम्या
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाच्या प्रदर्शनास तीव्र विरोध दर्शवला. या मुद्यावर बराच काळ चर्वितचर्वण झाल्यानंतर अखेर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राज यांनी काही अटी घालत सिनेमाला केलेला विरोध मागे घेतला. अखेर आज हा सिनेमा प्रदर्शित झाला असला तरी त्यासमोरील अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत असेच दिसते. 

 

Web Title: After the display 'A heart ...' also made it difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.