एकनाथ शिंदेंपाठोपाठ शिवसेना खासदार अरविंद सावंतही कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 12:40 PM2022-01-04T12:40:28+5:302022-01-04T12:41:01+5:30
Coronavirus In Maharashtra : यापूर्वी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा (Coronavirus Patients) खाली येणार आलेख आता पुन्हा वर जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. तर दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा विषाणूसह (Delta Variant), ओमायक्रॉनच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. दरम्यान, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापाठोपाठ आता शिवसेना खासदार अरविंद सावंत (Shiv Sena Mp Arvind Sawant) यांनाही कोरोनाची लागण झाल्याची (Tested Coronavirus Positive) माहिती समोर आली आहे. अरविंद सावंत यांनी ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली होती.
"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.," असं अरविंद सावंत यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!
— Arvind Sawant (@AGSawant) January 4, 2022
एकनाथ शिंदेंनाही कोरोना
"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.