जैन यांच्या जामिनानंतर जळगावात जल्लोष

By admin | Published: September 3, 2016 01:40 AM2016-09-03T01:40:09+5:302016-09-03T01:40:09+5:30

घरकूल प्रकरणात सुरेशदादा जैन यांना जामीन मिळाल्याचे वृत्त धडकताच जळगावात शिवसेना कार्यकर्ते व जैन समर्थकांनी जल्लोष केला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

After Jain's bail, Jolahat jalgaon | जैन यांच्या जामिनानंतर जळगावात जल्लोष

जैन यांच्या जामिनानंतर जळगावात जल्लोष

Next

जळगाव : घरकूल प्रकरणात सुरेशदादा जैन यांना जामीन मिळाल्याचे वृत्त धडकताच जळगावात शिवसेना कार्यकर्ते व जैन समर्थकांनी जल्लोष केला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी फटाके फोडून पेढे वाटले. शहरातील विविध चौकात युवाशक्ती फाउंडेशनच्या नेतृत्वात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
धुळ््यातील जैन समाज बांधव, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धुळे येथे सुरेशदादांची भेट घेत आनंद व्यक्त केला. न्यायालयाच्या आवारात उपस्थित कार्यकर्त्यांनी सुरेशदादांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आनंद व्यक्त केला. त्यानंतर माजी आमदार किसनराव खोपडे, माजी नगराध्यक्ष देवीदास शिनकर, अखिल भारतीय जैन संघटनेचे हरीश चोरडिया, मूलचंद सिंगवी, अभय मुणोत आदी पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या बाहेर सुरेशदादा यांची भेट घेतली व आनंद व्यक्त केला. काही कार्यकर्त्यांनी परिसरात पेढे वाटले. (प्रतिनिधी)

५४ संशयितांना जामीन
घरकूल प्रकरण खटल्यातील एकूण ५४ संशयितांना आतापर्यंत जामीन मिळाला आहे. प्रदीप रायसोनी, नाना वाणी, राजा मयूर यांच्यासह अनेकांना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यांना जळगाव शहरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र सुरेशदादा जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर केल्याने त्यांना जळगाव येथे राहता येणार आहे.

Web Title: After Jain's bail, Jolahat jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.