“महाराष्ट्रातील जनतादेखील कर्नाटकप्रमाणेच या गद्दारांच्या खोके सरकारला..,” आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 08:56 PM2023-05-13T20:56:57+5:302023-05-13T20:57:23+5:30

कर्नाटकात काँग्रेसनं तब्बल १३६ जागांवर विजय मिळत बहुमताचा जादुई आकडाही गाठला आहे.

after karnataka election 2023 result shiv sena uddhav thackeray aditya thackeray targets eknath shinde fadnavis government maharashtra | “महाराष्ट्रातील जनतादेखील कर्नाटकप्रमाणेच या गद्दारांच्या खोके सरकारला..,” आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

“महाराष्ट्रातील जनतादेखील कर्नाटकप्रमाणेच या गद्दारांच्या खोके सरकारला..,” आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

googlenewsNext

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. काँग्रेसनं तब्बल १३६ जागांवर विजय मिळत बहुमताचा जादुई आकडाही गाठला आहे. तर भाजपला ६५ जागांवर आणि जेडीएसला १९ जागांवर विजय मिळाला. यानंतर विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या निकालावरून राज्यातील सरकारवर निशाणा साधलाय.

“कर्नाटकात जसं ४० टक्के सरकार होतं, तसंच महाराष्ट्रात बळजबरीनं आणि लबाडीनं आणलेलं बिल्डर-कॉंट्रॅक्टर सरकार गेले काही महिने अस्तित्वात आहे. जे असंवैधानिक, अनैतिक आणि ४० टक्के सरकार पेक्षाही भ्रष्ट आहे! मतदानाची पहिली संधी मिळताच महाराष्ट्रातील जनतादेखील कर्नाटकप्रमाणेच ह्या गद्दारांच्या खोके सरकारला त्यांची खरी जागा दाखवून देईल,” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज्यातील सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला.



खर्गेचाही भाजपवर निशाणा

“हा एक मोठा विजय आहे. आम्हाच्यावर भाजप टीका करत होती की आम्ही काँग्रेसमुक्त भारत बनवू. परंतु आता भाजपमुक्त दक्षिण भारत झालाय हे सत्य आहे,” असं खर्गे म्हणाले. तुम्हाला सर्वांना असंच एकजुट व्हावं लागेल. तेव्हाच आपण ही लढाई जिंकू आणि तेव्हाच देश वाचवता येईल. जर लोकशाहीचं सरकार हवं असेल तर आपल्याला आणखी मोठी लढाई जिंकावी लागणार असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले.

Web Title: after karnataka election 2023 result shiv sena uddhav thackeray aditya thackeray targets eknath shinde fadnavis government maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.