ते गाणं ऐकल्यावर उद्धव ठाकरेंचा चेहरा डोळ्यांसमोर येतो, अमृता फडणवीसांचं खोचक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 08:55 PM2022-08-05T20:55:56+5:302022-08-05T20:57:39+5:30

Amruta Fadnavis: कशी नशिबानं थट्टा आज मांडली हे गाणं ऐकलं की उद्धव ठाकरे यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो, असं विधान अमृता फडणवीस यांनी बस बाई बस () या कार्यक्रमात केलं आहे.

After listening to that song, Uddhav Thackeray's face comes in front of the eyes, Amruta Fadnavis's cheeky reply | ते गाणं ऐकल्यावर उद्धव ठाकरेंचा चेहरा डोळ्यांसमोर येतो, अमृता फडणवीसांचं खोचक उत्तर

ते गाणं ऐकल्यावर उद्धव ठाकरेंचा चेहरा डोळ्यांसमोर येतो, अमृता फडणवीसांचं खोचक उत्तर

Next

मुंबई - जून महिन्यात राज्यात घडलेल्या राजकीय उलथापालथींदरम्यान शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली होती. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या या बंडात शिवसेनेचे ४० आमदार त्यांच्यासोबत गेल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, उद्धव ठाकरेंवर ओढवलेल्या या नामुष्कीवरून अमृता फडणवीस यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. कशी नशिबानं थट्टा आज मांडली हे गाणं ऐकलं की उद्धव ठाकरे यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो, असं विधान अमृता फडणवीस यांनी बस बाई बस या कार्यक्रमात केलं आहे.

झी मराठी या वाहिनीवर बस बाई बस हा कार्यक्रम सुरू आहे. अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कार्यक्रमात पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्याचे प्रोमो सध्या प्रसिद्ध होत असून, त्यामध्ये अमृता फडणवीस यांनी केलेल्या रोखठोक विधानांची चर्चा सुरू आहे.

या कार्यक्रमात सूत्रसंचालक सुबोध भावे यांनी कशी नशिबानं थट्टा आज मांडली हे गाणं ऐकल्यावर कुणाचा चेहरा डोळ्यांसमोर येतो असं विचारण्यात आलं असता अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे असं उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांचा मी मान आणि सन्मान ठेवते, पण हे गाणं ऐकल्यावर मला त्यांचाच चेहरा आठवला, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.  

Web Title: After listening to that song, Uddhav Thackeray's face comes in front of the eyes, Amruta Fadnavis's cheeky reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.