'लोकमत'च्या बातमीनंतर जयंत पाटलांच्या पेजवरून 'तो' फोटो उडवला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 07:29 PM2019-08-10T19:29:45+5:302019-08-10T20:03:06+5:30
सोशल मिडीयावर ट्रोल होताच हा फोटो डिलीट करण्यात आला आहे.
मुंबई - सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्यतीची प्रयत्न केले जात आहे. मात्र दुसरीकडे राजकीय नेते पूरग्रस्तांना मदतीची सुद्धा जाहिरात करत असल्याचे समोर आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पूरग्रस्तांना मदत करताना मदत पॅकेटच्या बॉक्सवर स्व:ताची फोटो लावून जाहिरातबाजी केली असल्याचे आरोप करण्यात येत होता. याबाबतची बातमी लोकमतने प्रसिध्द करताच जयंत पाटील यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून तो फोटो डिलीट केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर लावण्यात आलेले मदत पॅकेटची घटना समोर आली असतानाच, जयंत पाटील यांचा मदत पॅकेटच्या बॉक्सवर स्व:ताची फोटो लावलेल्या पोस्ट' सोशल मिडीयावर वायरल झाली होती. लोकमतने याबाबतची खात्री करण्यासाठी जयंत पाटील यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर जाऊन फोटो पाहिले असता, तिथे तो फोटो आढळून आला.
त्यानंतर, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा जाहिरातबाजीकरुन पूरग्रस्तांना मदत अशी बातमी 'लोकमत'ने करताच जयंत पाटील यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून हा फोटो डिलीट करण्यात आला आहे. तर हा फोटो खोटा असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र हा फोटो स्वःता जयंत पाटील यांच्या अधिकृत पेजवर टाकण्यात आला होता. मात्र सोशल मिडीयावर ट्रोल होताच हा फोटो डिलीट करण्यात आला आहे.