मराठा क्रांती मूक मोर्चानंतर समाजाचे ‘मराठा जोडो अभियान’
By admin | Published: April 1, 2017 03:42 AM2017-04-01T03:42:45+5:302017-04-01T03:42:45+5:30
मराठा समाजाच्या मराठा क्रांती मूक मोर्चानंतर हाती ठोस काही मिळाले नसल्याने,
मुंबई : मराठा समाजाच्या मराठा क्रांती मूक मोर्चानंतर हाती ठोस काही मिळाले नसल्याने, मराठा समाजाने नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. दादर येथे झालेल्या बैठकीत मुंबईत विखुरलेल्या मराठ्यांना एकत्रित ठेवण्यासाठी, ‘मराठा जोडो अभियान’ या नव्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
मोहिमेंतर्गत ‘मी मराठा’ या संकल्पनेवर अभियान राबविले जाईल. त्यासाठी वेबसाइट सुरू करण्यात आली असून, मराठा क्रांती मूक मोर्चाप्रमाणाचे ‘मी मराठा’ म्हणून स्टिकर्स प्रकाशित करण्यात आले. मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीने घरांवर, वाहनांवर व व्यवसायाच्या ठिकाणी स्टिकर्स लावून, ‘मी मराठा’ या संकल्पनेचा ठळकपणे प्रसार करावा, असे बैठकीत ठरवण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून भविष्यात विविध विधायक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात म्हणून मुंबईतील मराठा बांधव आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यापासून करतील. (प्रतिनिधी)