लग्नानंतर मूल जन्माला घालणं बंद केलं पाहिजे; अभिनेता अतुल कुलकर्णीचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 02:05 PM2020-01-06T14:05:17+5:302020-01-06T14:11:55+5:30

माझ्या लग्नाला २२-२३ वर्षे झाली. पण मी मूल जन्माला येऊ दिले नाही..

After marriage a child should stop giving birth : Atul Kulkarni | लग्नानंतर मूल जन्माला घालणं बंद केलं पाहिजे; अभिनेता अतुल कुलकर्णीचं मत

लग्नानंतर मूल जन्माला घालणं बंद केलं पाहिजे; अभिनेता अतुल कुलकर्णीचं मत

googlenewsNext
ठळक मुद्दे‘ग्रेटाची हाक’, तुम्हाला ऐकू येतेय पुस्तकाचे प्रकाशनस्वीडन, नॉर्वे या देशातील विद्यार्थ्यांना पुस्तकातून शिकवले जात नाही, लिंगभेद, जातीभेद

पुणे : पर्यावरणाचे बदल होत असताना, त्याचे संवर्धन करण्यासाठी आता नियम बदलणे आवश्यक आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड लोकसंख्या वाढली आहे. मूल जन्माला आले की, वस्तूंचा वापर सुरू होतो. आता वाढलेली लोकसंख्या रोखू शकत नाही. पण पर्यावरणाला वाचवणं आवश्यक आहे. त्यासाठी नियम बदलले पाहिजेत. लग्न केलं म्हणजे आता मूल झालंच पाहिजे. हे बदलायला हवे. मूल जन्माला घालणं बंद करायला हवे, अशी उदविग्नता संवेदनशील अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. माझ्या लग्नाला २२-२३ वर्षे झाली. पण मी मूल जन्माला येऊ दिले नाही, त्यासाठी हे एक कारण असल्याचेही त्यांनी सांगितले.

मनोविकास प्रकाशन आयोजित आणि अतुल देऊळगावकर लिखित  ‘ग्रेटाची हाक’, तुम्हाला ऐकू येतेय ना... या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लेखक अतुल देऊळगावकर, चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे, अरविंद पाटकर, आशिष पाटकर उपस्थित होते. 

कुलकर्णी म्हणाले, ‘‘जिवंत असलेल्या पिढीने येणाऱ्या पिढीला खाईत लोटले आहे. मागे वळून बघताना आपले काय चुकले, हे लक्षात आल्यानंतरही आपण वेगळा विचार करणार आहोत का? यशाच्या व्याख्या जशाच्या तशा येणाºया पिढीवर लादणार आहोत आहोत? शांतपणे आता वेळ आलीय आमचं चुकलं हे कबुल करण्याची, गाडी बंगला हे महत्त्वाचे वाटत आहे. स्पर्धेला महत्त्व दिले जात आहे. आजकाल तर खूप स्पर्धा आहे, असा पालकांमध्ये चर्चेचा विषय असतो. हेच आपण मुलांना शिकवतोय. आजकाल आपण खूप बिझी झालोय. बिझी हे यशस्वीतेचे लक्षण समजले जातेय. 

पुस्तकातून भेदभावापेक्षा निसर्ग संवर्धनाचे शिक्षण द्यावे 

स्वीडन, नॉर्वे या देशातील विद्यार्थ्यांना पुस्तकातून लिंगभेद, जातीभेद शिकवले जात नाही, तर निसर्गाचा, लोकशाहीचा आदर कसा करावा, हे शिकवले जाते. म्हणून तिकडची मुले समंजस आहेत. आपल्याकडे शिक्षणातून निसर्ग शिकवला पाहिजे. आता विज्ञान न सांगता प्रत्यक्ष कृती शिकवायला हवी, असे देऊळगावकर यांनी सांगितले. 
........

अतुल देऊळगावकर म्हणाले, येत्या २०५० पर्यंत आपण कार्बन उत्सर्जन शून्यावर आणायला हवे. अन्यथा २१ व्या शतकात तापमान ४ अंशाने वाढणार आहे. गेल्या आठवड्यात वैज्ञानिकांनी सांगितले की, हा उन्हाळा सर्वांत कडक असेल. दिल्लीतील प्रदूषण आपण जाणतोच. वैज्ञानिक सांगतात की, २.५ मायक्रॉन आकाराचे घन कण आपल्या फुप्फुसात जातात. परिणामी धुम्रपान न करणाºयांनाही कर्करोग होऊ शकतो. तसेच नाकातून हे कण गेल्याने मेंदूवर परिणाम करतात आणि मनोविकार होतात. आत्महत्या करण्याचे विचारही येतात. 
.......

लोक मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील बोगद्यातून उलट्या दिशेने वाहने चालवतात. त्यांना इतरांच्या जिवाची पर्वा तर नाहीच, पण किमान स्वत:च्या जिवाची तरी पर्वा करायला हवी ना? ग्रेटा म्हणते, मी आशावादी नाहीय. पण अस्वस्थ आहे. प्रत्येकाने आशावादी राहिले नाही तरी चालेल, परंतु अस्वस्थ जरूर असावे. मी कमी झाडं तोडली तर समोरची लोकं खूप झाडं तोडत आहेत. मग मी त्यांच्या मागे का राहू? अशी स्पर्धा घातक असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
....

मी खूप निराशावादी आहे, असं वाटत असेल. परंतु हा निराशावाद नाही, तर रिअ‍ॅलिटी चेक आहे. प्रत्येकात सकारात्मकता हवी. पण त्यांनी अगोदर रिअ‍ॅलिटी चेक करावी. आज हे अनेकजण विसरूनच गेल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: After marriage a child should stop giving birth : Atul Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.