लग्नानंतर वर्षभरात मूल होते; पण निधी खर्च होत नाही - बबनराव लोणीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 01:17 AM2018-09-08T01:17:37+5:302018-09-08T01:18:48+5:30
पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देऊनही तो खर्च केला जात नाही. लग्न झाल्यानंतर वर्षभरात मुल होते. येथे दोन-दोन वर्षे उलटूनही अधिकारी जनहिताची कामे करणार नसतील तर अशा निष्क्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना म्हशीचे इंजेक्शन द्यावे लागेल, असे वादग्रस्त विधान पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी केले आहे.
नांदेड : पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देऊनही तो खर्च केला जात नाही. लग्न झाल्यानंतर वर्षभरात मुल होते. येथे दोन-दोन वर्षे उलटूनही अधिकारी जनहिताची कामे करणार नसतील तर अशा निष्क्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना म्हशीचे इंजेक्शन द्यावे लागेल, असे वादग्रस्त विधान पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी केले आहे.
भाजप आमदार राम कदम यांंच्यानंतर लोणीकरांच्या या विधानाने भाजपच्या अडचणीत भर घातली आहे. मागील दोन वर्षांत पाणी पुरवठा योजनांसाठी नांदेड जिल्ह्याला १३८ कोटी रुपये दिले आहेत. मात्र अनेक योजना अर्धवट तर काहींच्या कामालाही सुरुवात झालेली नाही. अशा निष्क्रीय अधिकारी-कर्मचाºयांना ढोपरापासून कोपरापर्यंत म्हशीचे इंजेक्शन द्यावे लागेल, असे लोणीकर म्हणाले. भूमिपूजन झालेल्या योजना वेळेत मार्गी लावा. कामात कुचराई केल्यास गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत लोणीकर यांनी अधिकाºयांना सुनावले. उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळेच पाणी पुरवठ्याच्या विविध योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र यंत्रणेच्या संथ गतीमुळे पाणी मिळत नाही.