लष्करी हल्ल्यानंतर नेटिझन्समध्ये राष्ट्रभक्तीचे उधाण

By admin | Published: September 30, 2016 03:50 AM2016-09-30T03:50:22+5:302016-09-30T03:50:22+5:30

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधानांनीही दखल घ्यावी इतपत आक्रोश व्यक्त करणाऱ्या आणि सरकारने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडण्याचे संयमी

After the military strike, the patriotism expansion in netizens | लष्करी हल्ल्यानंतर नेटिझन्समध्ये राष्ट्रभक्तीचे उधाण

लष्करी हल्ल्यानंतर नेटिझन्समध्ये राष्ट्रभक्तीचे उधाण

Next

मुंबई : उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधानांनीही दखल घ्यावी इतपत आक्रोश व्यक्त करणाऱ्या आणि सरकारने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडण्याचे संयमी धोरण जाहीर केल्यावर नाराज झालेल्या नेटिझन्समध्ये लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’नंतर मात्र गुरुवारी राष्ट्रभक्तीचे उधाण आले. उरीच्या हल्लेखोरांना चोख उत्तर देण्याचे वचन सरकारने पाळल्याबद्दल समाधान व्यक्त करीत असतानाच समाजमाध्यमांमधून लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
गुरुवारचा संपूर्ण दिवस टिष्ट्वटरवर ‘हॅशटॅग सर्जिकल स्ट्राईक’ हा ट्रेंड राहिला आणि रात्रीपर्यंत ‘इंडियन आर्मी’चे अभिनंदन करणाऱ्या टष्ट्वीट्सची संख्या दोन लाखांच्या जवळपास पोहोचली. एकंदर फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅपवरवर आलेल्या यासारख्या असंख्य नोटिफीकेशन आणि चित्र-संदेशांनी नेटिझन्सचे मोबाईल खणखणत राहिल्याने भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तराचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत होते.
उरी हल्ल्याबाबत प्रचंड हळहळ व्यक्त करणाऱ्या नेटिझन्समध्ये स्ट्राईक्सचे वृत्त समजताच अभिमानाची आणि अभिनंदनाची भावना जागृत झाली. भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत स्ट्राईकची माहिती दिली. त्यानंतर काही वेळात हे वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. (प्रतिनिधी)

बॉलिवूडमध्येही आनंद
भारतीय जवानांच्या पाठीवर बॉलिवूडनेही शाबासकीची थाप दिली. नेटिझन्स म्हणून सक्रिय असलेल्या बॉलिवूडच्या अनेक मान्यवरांनी अभिनंदन, कौतूक आणि समाधानाची भावना व्यक्त केली.
बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरु ख याने कौतुक करताना म्हटले की, भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई ही कौतुकास्पद आहे.
भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात कारवाई केली, त्याबद्दल धन्यवाद ! जवानांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी मी प्रार्थना करेन. शाहरु खसह, आशा भोसले, वरु ण धवन यांनी देखील भारतीय जवानांचे कौतुक केले आहे.

‘दसऱ्या आधी सीमोल्लंघन करत दिवाळी आधीच फटाके फोडल्याने भारतीय सैन्याचे खुप खुप आभार, अशा शब्दांत नेटिझन्सने शुभेच्छा देत लष्कराचे अभिनंदन केले. शिवाय काही नेटिझन्सनी आपल्या डिपीमध्ये तिरंग्याला सलाम करणाऱ्या सैनिकांच्या छायाचित्राला स्थान दिले.
तर काही नेटिझन्समध्ये ‘पाकमध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात-पंतप्रधानांची घोषणा...’ अशा स्वरुपात पाकची खिल्ली उडवणारे संदेश व्हायरल झाले. नेते, अभिनेते, खेळाडू या सर्वांनी आपआपल्या पद्धतीने सोशल मिडियावर व्यक्त होत भारतीय सैन्याचे कौतुक केले.

Web Title: After the military strike, the patriotism expansion in netizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.