“येत्या काळात राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असेल”; सुप्रिया सुळेंच्या सूरात धनंजय मुंडेंचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 03:47 PM2022-06-04T15:47:46+5:302022-06-04T15:48:26+5:30

काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्रीपद असण्यासंदर्भात सूचक विधान केले होते.

after ncp mp supriya sule party leader dhananjay munde said next chief minister of maharashtra will be from ncp | “येत्या काळात राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असेल”; सुप्रिया सुळेंच्या सूरात धनंजय मुंडेंचा सूर

“येत्या काळात राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असेल”; सुप्रिया सुळेंच्या सूरात धनंजय मुंडेंचा सूर

Next

सातारा: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला आता अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपची युती फिस्कटल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदााबाबतची वक्तव्ये समोर येत असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत विधान केले होते. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)

साताऱ्यातील डिस्कळ येथील शेतकरी मेळावाच्या सभेत हे विधान केले आहे. यावेळी विविध विकास कामांच्या उद्घाटनाबरोबर त्यांचा खटाव तालूक्यातील डिस्कळ येथे झालेला शेतकरी मेळावा चांगलाच गाजला. काही दिवसांपूर्वीच तुळजापूर येथे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याबाबत विधान केले होते. त्यानंतर आता लगेचच सुप्रिया सुळे यांच्या सूरात सूर मिसळत धनंजय मुंडे यांनी येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार असल्याचे सूचक विधान केले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असेल

धनंजय मुंडे यांनी या शेतकरी मेळाव्यात महाविकास आघाडीचेच घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या आमदारांवरही अप्रत्यक्ष टीका केली. पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रिपदाचे खाते हे आपल्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असेल, असे धनंजय मुंडे म्हणाले. पवार साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली होती. पाच वर्षे विरोधी पक्षनेता होतो आणि ती जबाबदारी पार पाडली. आज शब्द देतो... सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचा मंत्री म्हणून... येणाऱ्या काळात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचं मंत्रिपद द्यायचे कुणाला? जे कुणी मुख्यमंत्री असतील.... ते आपलेच असतील. ते म्हणतील हे विभाग आपल्या शिवाय दुसऱ्या कुणालाच नको, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, असे साकडे देवीला घातले आहे. तसेच, मी मुख्यमंत्री व्हावे असा विचार कधी केला नाही,याचा निर्णय राज्याची जनताच घेईल, अशी प्रतिक्रियाही सुळे यांनी दिली होती. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे. पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार, असेही त्यांनी म्हटले होते. खरेतर आपल्याला काय मिळाले, याबद्दल देवळात आभार मानण्यासाठी येत असते. मंदिरात आल्यानंतर इथे जमलेले कार्यकर्ते आणि पुजारी यांनी काहीतरी मागणी करावी अशी मागणी केली होती. त्यावेळी राज्यात चांगला पाऊस पडू दे, देशातला शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. त्याला दिलासा मिळू दे, असे साकडे घातले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 
 

Web Title: after ncp mp supriya sule party leader dhananjay munde said next chief minister of maharashtra will be from ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.