पेपर फुटीनंतर देशभरातील सैन्यभरतीची परीक्षा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2017 08:47 AM2017-02-26T08:47:42+5:302017-02-26T16:36:59+5:30

देशभरातील विविध केंद्रांवर आज होत असलेल्या सैन्यभरतीचा पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणानंतर सैन्यभरीताचे देशभरातील पेपर रद्द करण्यात आले आहेत.

After the paper separation, the countrywide recruitment test was canceled | पेपर फुटीनंतर देशभरातील सैन्यभरतीची परीक्षा रद्द

पेपर फुटीनंतर देशभरातील सैन्यभरतीची परीक्षा रद्द

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि.26 - देशभरातील विविध केंद्रांवर आज होत असलेल्या सैन्य भरतीचा पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणानंतर सैन्यभरीतीचे पेपर रद्द करण्यात आले आहेत. या प्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने 18 आरोपींसह 350 विद्यार्थ्यांना अटक केली आहे. 
 
राज्याच्या नागपूर,पुणे,नाशिक आणि गोवा येथे परिक्षा केंद्रांवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा क्राईम ब्रांचने कारवाईला सुरुवात केली असून सकाळपर्यंत छापेमारी सुरु होती.
 
आज सकाळी 9 वाजता सैन्यभरतीची लेखी परीक्षा होत आहे. मात्र, आदल्या दिवशी रात्रीच हॉटेल आणि लॉजमध्ये विद्यार्थ्यांना गोळा करुन आरोपी त्यांच्याकडून परीक्षेचा पेपर  लिहून घेत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. 
 

Web Title: After the paper separation, the countrywide recruitment test was canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.