पावसाचा जोर शुक्रवारनंतर
By Admin | Published: June 22, 2017 06:50 AM2017-06-22T06:50:17+5:302017-06-22T06:50:17+5:30
राज्यभर पाऊस व्यापण्यास येत्या शुक्रवार-शनिवारची वाट पाहावी लागणार आहे. कोकण वगळता इतर भागांत पावसाने पाठ फिरविली असल्याचे चित्र राज्यात कायम आहे.
पुणे : राज्यभर पाऊस व्यापण्यास येत्या शुक्रवार-शनिवारची वाट पाहावी लागणार आहे. कोकण वगळता इतर भागांत पावसाने पाठ फिरविली असल्याचे चित्र राज्यात कायम आहे.
राज्यातील बहुतांश भागातून पाऊस गायब झाला आहे. कोकणातील बहुतांश भागात पावसाचा जोर कायम आहे. कणकवली, म्हापसा, मार्मगोवा, मुरगाव येथे प्रत्येकी ५० मिलिमीटर, पेरनेम, सांगे येथे प्रत्येकी ४०, लांजा, मडगाव, मुलदे येथे प्रत्येकी ३०, रत्नागिरी, श्रीवर्धन, सुधागडपल्ली येथे प्रत्येकी २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील वेल्हे ३०, गगनबावडा, महाबळेश्वर प्रत्येकी २०, चंदगड, पन्हाळा, पेठ, राधानगरी येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पाऊस झाला. कोयना परिसरातील पोफळी येथे ६० आणि नवजा येथे ५० मिलिमीटर पाऊस झाला. गिरगाव, डुंगरवाडी, ताम्हिणी येथे प्रत्येकी ३०, भिरा, लोणावळा, दावडी येथे २० आणि अंबोणे येथे १० मिलिमीटर पाऊस झाला. अप्पर वैतरणा पाणलोटक्षेत्रात २० आणि भातसा येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.