शनीशिंगणापूरात महिलेच्या बंडानंतर ग्रामस्थाचा देवाला दग्धाभिषेक
By admin | Published: November 29, 2015 09:30 AM2015-11-29T09:30:56+5:302015-11-29T18:52:27+5:30
शनी शिंगणापूर एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन शनी देवाला तेलाचा अभिषेक केल्यानंतर शुद्धीकरणासाठी गावक-यांनी देवाला दुग्धाभिषेक घातला
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि.२९ - शनी शिंगणापूर एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन शनी देवाला तेलाचा अभिषेक केल्यानंतर शुद्धीकरणासाठी गावक-यांनी देवाला दुग्धाभिषेक घातला. तसेच याप्रकरणी सात सुरक्षा रक्षकांना जबाबदार ठरवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
शनी शिंगणापूर येथे शनी चौथऱ्यावर महिलांना जाण्यास बंदी असतानाही शनिवारी पुण्यातील एका महिलेने चौथ-यावर जाऊन शनीे दर्शन घेतले तसेच देवाला तेलही वाहिले. यामुळे गावकरी संतप्त झाले व त्या निषेधार्थ आज शनी शिंगणापूर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून बंद मागे घेतल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.
पण या घटनेनंतर देवाच्या शुद्धीकरणासाठी ग्रामस्थांनी शनी देवाला दुग्धाभिषेक घातला. तसेच ग्रामसभा घेऊन सुरक्षा यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप ठेवत सात सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले. मात्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीने त्या महिलेच्या धाडसाचे स्वागत केले आहे.