निवृत्तीनंतरही बडे अधिकारी सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 06:34 AM2018-06-01T06:34:02+5:302018-06-01T06:34:02+5:30
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील तब्बल २२६ बडे अधिकारी गुरुवारी सेवानिवृत्त होणार होते
मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील तब्बल २२६ बडे अधिकारी गुरुवारी सेवानिवृत्त होणार होते, पण त्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य निर्णयाच्या अधीन राहून त्यांना सेवेत कायम ठेवण्यात आले. यापैकी बरेच अधिकारी असे आहेत की ज्यांनी आरोग्य विभाग वर्षानुवर्षे अक्षरश: चालविला आहे. त्यांचे वरपर्यंत लागेबांधे आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटना करीत असलेल्या संघर्षाला दाद न देणारे सरकार आरोग्य अधिकाºयांवर मात्र मेहरबान झाले आहे.
सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने राज्य शासन कुठलाही मोठा धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. आपण तर ३१ मे रोजी निवृत्त होणार आहोत पण आचारसंहितेमुळे आपल्या निवृत्तीचे वय राज्य शासन ६० वर्षे होऊ शकणार नाही, याची पूर्वकल्पना असलेल्या आरोग्य अधिकाºयांनी गेले काही दिवस ‘लॉबिंग’ चालविले
होते.
सरकारच्या आजच्या निर्णयामुळे प्रस्थापित अधिकाºयांची सद्दी दोन वर्षे कायम राहणार असून या प्रस्थापितांपासून मोकळा श्वास मिळण्याची आरोग्य विभागाची आशा मात्र मावळली आहे.
सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा शासनाने कुठलाही निर्णय
घेतलेला नसतानादेखील ज्यांना निवृत्तीनंतर सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय गुरुवारी झाला त्यात गट अ -ग्रेड पे ६६०० मधील १३५ अधिकारी, गट अ ग्रेड पे ५४०० मधील ८२ अधिकारी आणि राज्य कामगार विमा योजनेतील ९ अधिकाºयांचा समावेश आहे.