पंतप्रधानांना निवृत्तीनंतर वीज, पाणी मोफत

By admin | Published: May 7, 2014 11:02 PM2014-05-07T23:02:50+5:302014-05-08T14:19:45+5:30

नगर विकास मंत्रालयाने निवृत्तीनंतर सरकारी घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींकडून आकारण्याच्या शुल्कासंबंधीच्या आधीच्या आदेशात बदल केला आहे.

After the retirement of the Prime Minister, electricity, water free | पंतप्रधानांना निवृत्तीनंतर वीज, पाणी मोफत

पंतप्रधानांना निवृत्तीनंतर वीज, पाणी मोफत

Next

नियमांत बदल : डॉ. सिंग साधेपणाने राहणार, निकालापूर्वीच सध्याचे निवासस्थान सोडणार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून नवे सरकार अधिकारावर आल्यावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निवृत्तीनंतरच्या वास्तव्यासाठी मोतीलाल नेहरू मार्गावरील सरकारी बंगल्यात वास्तव्यास जातील तेव्हा त्यांना तेथे मोफत वीज व पाणी पुरविण्याची सोय संपुआ सरकारने केली आहे. यासाठी नगर विकास मंत्रालयाने निवृत्तीनंतर सरकारी घरांमध्ये राहणार्‍या व्यक्तींकडून आकारण्याच्या शुल्कासंबंधीच्या आधीच्या आदेशात बदल केला आहे. अर्थात या बदललेल्या नियमाचा फायदा एकट्या डॉ. सिंग यांना मिळणार नसून निवृत्तीनंतर नवी दिल्लीत सरकारी बंगल्यांमध्ये राहणार्‍या सर्वच माजी पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना व उपराष्ट्रपतींना मिळणार आहे. विद्यमान खासदारांनाही त्यांच्या सरकारी घरासाठी पुरविल्या जाणार्‍या वीज व पाण्याचे बिल एका ठराविक मर्यादेपर्यंत माफ करण्याची तरतूद आहे. मात्र नव्या सुधारित नियमानुसार पंतप्रधांनाच्या बाबतीत अशी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. Þडॉ. सिंग यांना निवृत्तीनंतर विरोधी पक्षनेत्यास लागू असलेल्या सोयी-सुविधा मिळतील. त्यानुसार त्यांना व्यक्तिगत कर्मचारी म्हणून १४ जणांची नेमणूक करता येईल व किरकोळ खर्चासाठी त्यांना दरमहा सहा हजार रुपये भत्ता मिळेल. याखेरीज सरकारी बंगल्यासाठी त्यांना दरमहा १,२०० रुपये एवढे नाममात्र भाडे आकारण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. डॉ. सिंग निवृत्तीनंतर ज्या ‘टाईप-आठ’च्या सरकारी बंगल्यात वास्तव्यास जाणार आहेत तो २.५ एकर एवढ्या प्रशस्त आवारात असून त्यास कर्मचारी निवासस्थानेही स्वतंत्र आहेत. आता केरळच्या राज्यपाल असलेल्या शीला दिक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या तेव्हा हा बंगला त्यांचे सरकारी निवासस्थान होते. आपल्या वास्तव्यासाठी हा बंगला तयार करताना डागडुजी व रंगरंगोटीवर वारेमाप खर्च न करता तो साधेपणाने तयार करावा, अशा सूचना डॉ. सिंग यांनी आपल्या कार्यालयास आधीच दिल्या आहेत. तसेच फर्निचर, ए.सी. व रेफ्रिजरेटर यासारख्या गोष्टींवरचा खर्च २.५ लाख रुपये या मंजूर मर्यादेतच करण्यासही त्यांनी सांगितले आहे. (लोेकमत न्यूज नेटवर्क)

सूत्रांनी सांगितले की, आधी या बंगल्यात शीला दीक्षित वास्तव्यास होत्या तेव्हा तेथे २६ एसी बसविलेले होते. त्यांनी बंगला सोडल्यानंतर हे सर्व एसी काढण्यात आले. आता आपल्यासाठी या बंगल्यात चार ते पाचपेक्षा जास्त एसी बसवू नयेत, अशी विनंती डॉ. सिंग यांनी केली आहे. ४लोकसभा निवडणुकीचे निकाल १६ मे रोजी लागणार आहेत. त्याच्या एक दिवस आधी आपण आपल्या निवृत्तीनंतरच्या या घरात राहायला जाऊ, असे डॉ. सिंग यांनी कळविले होते. त्यादृष्टीने बंगल्यात करायच्या दुरुस्त्या व डागडुजीचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरविले होते; पण ते शक्य झालेले नाही.

 याचे कारण सांगताना एका अधिकार्‍याने सांगितले की, शीला दीक्षित राहात होत्या तेव्हा या बंगल्यात सगळीकडे ‘वूडन फ्लोरिंग’ होते; परंतु आपल्याला ते नको, साधी फरसबंदी करावी, अशी इच्छा डॉ. सिंग यांनी व्यक्त केली. त्यामुळे ‘वूडन फ्लोरिंग’ काढले गेले. पण ते करताना खालच्या लादीच्या फ्लोरिंगचे नुकसान झाले. त्यामुळे ते पूर्णपणे नव्याने करावे लागले.

Web Title: After the retirement of the Prime Minister, electricity, water free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.