Jitendra Awhad on Shridhar Patankar ED Raids: "माझ्या मुलीला आता मी महाराष्ट्रात ठेवणार नाही.."; मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या मेहुण्यावरील ED कारवाईनंतर जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 09:42 PM2022-03-22T21:42:29+5:302022-03-22T21:42:48+5:30

रश्मी ठाकरेंचे बंधू पाटणकर यांचे ११ फ्लॅट्स ईडीकडून जप्त झाल्याच्या मुद्द्यावर आव्हाडांनी दिली प्रतिक्रिया

After Sharad Pawar Jitendra Awhad reaction on CM uddhav Thackeray brother in law Shridhar Patankar ED Raids at Thane Rashmi Thackeray | Jitendra Awhad on Shridhar Patankar ED Raids: "माझ्या मुलीला आता मी महाराष्ट्रात ठेवणार नाही.."; मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या मेहुण्यावरील ED कारवाईनंतर जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

Jitendra Awhad on Shridhar Patankar ED Raids: "माझ्या मुलीला आता मी महाराष्ट्रात ठेवणार नाही.."; मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या मेहुण्यावरील ED कारवाईनंतर जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

googlenewsNext

Jitendra Awhad on Shridhar Patankar ED Raids: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी दुपारी ईडीकडून कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे असलेले श्रीधर पाटणकर यांची अंदाजे साडेसहा कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यात ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ फ्लॅट्स (सदनिका) जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. PMLA कायद्यानुसार ईडीने ठाण्यात ही कारवाई केली. या कारवाईनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेतेमंडळी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया आल्या. श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे बंधू असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे मी आता माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

"राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. राज्य सरकारने काही नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, पण कोणाला तुरूंगात डांबलेलं नाही. आता आज झालेल्या कारवाईनंतर अशा गोष्टींवर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल हे नक्की. पण माझं मत सांगायचं तर आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही", असं अतिशय मोठं आणि सूचक विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

"राज्याने कुणावरही कधी अशी सूडबुद्धीने कारवाई केलेली नाही. कुणाला जेलमध्ये टाकलंय असं झालेलं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे. विरोधकांनी सरकार अस्थिर करायचा प्रयत्न करायला हरकत नाही. पण ते अशा माध्यमातून करावं हे चुकीचं आहे. हे म्हणजे लोकशाहीचा मुडदा पाडण्याचं राजकारण आहे. अशाप्रकारे तपास यंत्रणेचा गैरवापर करुन जर राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असतील तर ते महाराष्ट्रातील जनता बघतेय. तुम्ही आम्हाला कितीही डिवचलंत, तरी आम्ही कोसळणार नाही", असंही आव्हाड म्हणाले.

Web Title: After Sharad Pawar Jitendra Awhad reaction on CM uddhav Thackeray brother in law Shridhar Patankar ED Raids at Thane Rashmi Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.