एका तपानंतर आज प्रकटणार ‘गंगाभागीरथी’

By admin | Published: August 11, 2016 05:29 PM2016-08-11T17:29:18+5:302016-08-11T17:29:18+5:30

क्षेत्र महाबळेश्वर येथील गंगाभागीरथी कुंड सतत अकरा वर्षे कोरडे असते. त्यातून पाण्याचा एकही थेंब येत नाही. मात्र गुरू ग्रहाने कन्या राशीमध्ये प्रवेश केला की अचानक गंगाभागीरथी

After a short break, 'Gangakhiarathiathi' will appear today | एका तपानंतर आज प्रकटणार ‘गंगाभागीरथी’

एका तपानंतर आज प्रकटणार ‘गंगाभागीरथी’

Next
>ऑनलाइन लोकमत 
महाबळेश्वर, दि.11 - क्षेत्र महाबळेश्वर येथील गंगाभागीरथी कुंड सतत अकरा वर्षे कोरडे असते. त्यातून पाण्याचा एकही थेंब येत नाही. मात्र गुरू ग्रहाने कन्या राशीमध्ये प्रवेश केला की अचानक गंगाभागीरथी प्रवाहातून जलस्त्रोत सुरू होतो अन तो सतत वर्षभर सुरू राहतो. तब्बल बारा वर्षांनंतर आज गुरुवार दि. ११ ऑगस्ट रोजी हा योग आला आहे. महाबळेश्वरातून उगम पावणा-या सात नद्यांपैकी अकरा वर्षे कोरडी राहणारी 'गंगाभागीरथी' नदी तब्बल एक तपानंतर प्रकट होणार आहे. 
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे भाविक स्नानविधी, गंगा-पूजन, महापूजा, नैैवेद्य, व श्राद्धादी कर्मे करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. सर्व पितरांच्या उद्धाराबरोबरच ऐहिक व पारलौकिक सुखाचा लाभ पातकांचा नाश या महापर्वकाळात होतो, असे शास्त्रवचन आहे. 
दक्षिण भारतातील एक प्राचीन सुप्रसिद्ध तीर्थस्थळ असलेले श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे यंदाचे वर्षी शके १९३८ मधे श्रावण शु. ८ गुरुवार, दि. ११ ऑगस्ट २0१६ रोजी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी बारावर्षांतून गुरू कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे. यावेळी भागीरथी नदी जलप्रवाह दृष्टिक्षेपास येणार आहे. हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी क्षेत्र महाबळेश्वर येथे राज्यभरातील भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.

Web Title: After a short break, 'Gangakhiarathiathi' will appear today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.