देवकर यांची मुक्तता तांत्रिक पूर्ततेनंतरच

By admin | Published: January 7, 2015 01:26 AM2015-01-07T01:26:36+5:302015-01-07T01:26:36+5:30

जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आरोपी माजी मंत्री गुलाबराव देवकर तांत्रिक बाबींची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर बुधवारी किंवा गुरुवारी कारागृहातून बाहेर येतील,

After the technical compliance of the release of Devakar | देवकर यांची मुक्तता तांत्रिक पूर्ततेनंतरच

देवकर यांची मुक्तता तांत्रिक पूर्ततेनंतरच

Next

धुळे : जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आरोपी माजी मंत्री गुलाबराव देवकर तांत्रिक बाबींची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर बुधवारी किंवा गुरुवारी कारागृहातून बाहेर येतील, अशी माहिती त्यांचे वकील अ‍ॅड. सी़ डी़ सोनार यांनी दिली़
देवकर यांना सर्वाेच्च न्यायालयाचे न्या. जे. चेलमेश्वर आणि पिनाकी घोष यांच्या द्विसदस्यीय पीठाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला़ ते निकालपत्र प्राप्त झाल्यावर धुळे विशेष न्यायालयासमोर सादर केले जाईल़ त्यानंतर देवकरांची कारागृहातून सुटका होईल़, असे अ‍ॅड. सोनार म्हणाले. देवकर सध्या न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने उजव्या डोळ्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. देवकर यांना १० जानेवारीपर्यंत उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

न्यायव्यवस्थेवर विश्वास
वर्षभरापासून मी धुळे कारागृहात होतो़ जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने मला न्याय दिला. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे़
- गुलाबराव देवकर, माजी मंत्री

Web Title: After the technical compliance of the release of Devakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.