...त्यानंतर माझी राजकारणाची सुरुवात झाली; शरद पवारांनी सांगितली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 07:15 PM2023-03-04T19:15:44+5:302023-03-04T19:16:45+5:30

Sharad Pawar: माझ्या राजकारणाची सुरुवात तिथून झाली आणि आज मी अजून राजकारणात आहे, असे शरद पवारांनी सांगितले.

after that my politics started ncp chief sharad pawar told the memory | ...त्यानंतर माझी राजकारणाची सुरुवात झाली; शरद पवारांनी सांगितली आठवण

...त्यानंतर माझी राजकारणाची सुरुवात झाली; शरद पवारांनी सांगितली आठवण

googlenewsNext

बारामती: मला शाळेचा अभ्यासाचा कंटाळा यायचा. शाळा संपली की बाहेर वेळ घालवायचो.शाळेत शिकत असताना माझ्या आईला वाटत होते की मी शिकत नाही, म्हणून माझ्या भावाकडे मला राहायला पाठवले. त्यानंतर प्रवरानगरला शाळेत प्रवेश घेतला.त्यावेळी  पोर्तुगीज मुक्त गोवा, अशी मागणी केली जात होती. काही लोक महाराष्ट्रातून तिकडे गेले होतें. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार केला.काहीजण मृत्युमुखी पडलें, त्यानंतर महाराष्ट्र पेटून उठला. आम्ही ज्या शाळेत शिकत होतो ,ती शाळा आम्ही बंद पडली.माझ्या राजकारणाची सुरुवात तिथून झाली आणि आज मी अजून राजकारणात आहे,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय प्रवेशाची आठवण सांगितली.

बारामती येथील गदीमा सभागृहात विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तारांगण युवा महोत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांनी पवार यांची मुलाखत घेतली.यावेळी विद्यार्थ्यांनी पवार यांना राजकारणात नसता तर कुठल्या क्षेत्रात असता? राजकारणात कसे आला? यावर ते उत्तर देताना बोलत होते.विद्यार्थ्यांनी  विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे  उत्तरे दिली.त्यावर विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवुन प्रतिसाद दिला.  शालेय जीवनात शिष्यवृत्ती मिळाली त्यानंतर सार्वजनिक जीवनात कसे काम करायचं याचा फायदा झाला,या प्रश्नावर पवार म्हणाले, पहिल्यांदा मला मुंबई तून टोकियो ला पाठवले. ती शिष्यवृत्ती मला युनोस्को ने दिली. त्यावेळी मी १ दिवस जनापच्या प्रधानमंत्री यांच्यासोबत जवळुन बघता आले. जपानचे लोक मर्यादित बोलतात. यासह अनेक देशातील लोकांना भेटण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा मला आजही होत असल्याचे पवार यांनी नमुद केले.

कृषिमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा मला मनमोहन सिंग यांचा फोन आला. त्यांनीं सांगितले की एक फाईल पाठवली आहे बघा. त्या फाईलमध्ये  ४ आठवडे पुरेल एवढा गहू आहे,असे लिहीले होते. माझ्या देशातील भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी परदेशी धान्य आणावे लागते आहे. त्यानंतर ही परिस्थिती बदलेल. त्या दृष्टीने उपययोजना केल्या काही वर्षात भारत निर्यात दार देश झाल्याची आठवण देखील ज्येष्ठ नेते  पवार यांनी सांगितली. लातूरचा भूकंप झाला तेव्हा गणपती विसर्जन झाले. मी त्या दिवशी मध्यरात्री ३ वाजता झोपायला गेलो. त्यानंतर १५ मिनिटात माझ्या रुमच्या खिडक्या वाजल्या. मी म्हटल भूकंप झाला.  मी कोयनाला फोन केला.ते म्हणाले इथे भूकंप झाला नाही. लातूरला भूकंप झाला. तेव्हा सकाळी मी ६ वाजता लातूरला पोहोचलो.लातूरला ९ हजार लोक मृत पावले, तर १लाख घरे पडली. त्यावेळी मी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि मदत मागितली. ३ तासात मदत यायला सुरुवात झाली. १५ दिवस मी लातूरला राहिलो.जागतिक बँकेने मला अमेरिकेत बोलावलं आणि माझं भाषण द्यायला सांगितल्याचे पवार यांनी सांगितले.

...क्रिकेट मध्ये राजकारण येऊ दिले नाही

क्रिकेट माझे क्षेत्र नव्हते. माझे सासरे क्रिकेटर होते. माझ्या लग्नाला क्रिकेटर हजर होतें. त्यानंतर क्रिकेटशी जवळीक निर्माण झाली. गरवारे क्लबचे भांडण होते. ते मिटत नव्हते. म्हणून त्या संघटनेच्या निवडणुकीला मी उभा राहिलो आणि निवडून आलो. मी कधी क्रिकेट मध्ये राजकारण येऊ दिले नाही. ज्या दिवशी भारत देश क्रिकेट मध्ये अव्वल झाला ,त्यावेळी मी राजीनामा दिल्याचे पवार म्हणाले.

पूर्वी  पितळीत चहा मिळायचा

आनंद देणारी गोष्टी कारण? राज्यात कुठेही गेलं तरी लोक आस्थेने बोलतात,लोकांच्या जीवनात आणि राहणीमान बदल झाले की समाधान मिळते.  पूर्वी पितळीत चहा मिळायचा. परत चहा कपात आणायचे ,पण कपाचे कान तुटलेला असायचा. आज त्याच घरातील  सूनेकडुन  ट्रे मधून चहा येतो, हे बघितल्यावर समाधान मिळते,असे शरद पवार म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: after that my politics started ncp chief sharad pawar told the memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.