लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत मोठी बिघाडी? भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत रंगणार सामना

By मनोहर कुंभेजकर | Published: June 5, 2024 04:53 PM2024-06-05T16:53:26+5:302024-06-05T16:54:41+5:30

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक शिंदे सेना लढणार

After the result of the Lok Sabha mess in Mahayuti as BJP and Shiv Sena will fight | लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत मोठी बिघाडी? भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत रंगणार सामना

लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत मोठी बिघाडी? भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत रंगणार सामना

मनोहर कुंभेजकर, मुंबई: विधान परिषद निवडणुकीसाठी तीन जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज आज कोकण भवन येथे दाखल केला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आज सकाळी मुंबई पदवीधर मतदार संघातून माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवाजी शेंडगे आणि कोकण पदवीधर मतदार संघातून शिंदे सेनेचे सचिव संजय मोरे आज सकाळी कोकण भवन येथे आले आणि आपला निवडणूक अर्ज सादर केला.

यापूर्वी भाजपाने मुंबई पदवीधर साठी किरण शेलार, मुंबई शिक्षक साठी शिवनाथ दराडे आणि कोकण पदवीधर साठी विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर उद्धव सेनेने पदवीधरसाठी माजी मंत्री डॉ. अनिल परब, शिक्षक मधून ज. मो. अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Web Title: After the result of the Lok Sabha mess in Mahayuti as BJP and Shiv Sena will fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.