हिंगोलीत तीन तासांच्या थरारानंतर दरोडेखोर जाळ्यात

By admin | Published: August 3, 2016 09:42 PM2016-08-03T21:42:17+5:302016-08-03T21:42:17+5:30

येथील हैदराबाद बँक शाखेच्या व्यवहारासाठी आणलेली ४० लाखांची रोकड बँकेच्या दारातूनच कर्मचाऱ्यास शस्त्राचा धाक दाखवत दिवसाढवळ्या चोरट्यांनी लुटल्याची घटना

After three hours of tremors in Hingoli, the robbery is trapped | हिंगोलीत तीन तासांच्या थरारानंतर दरोडेखोर जाळ्यात

हिंगोलीत तीन तासांच्या थरारानंतर दरोडेखोर जाळ्यात

Next

ऑनलाइन लोकमत

सेनगाव (जि. हिंगोली), दि ३ -   येथील हैदराबाद बँक शाखेच्या व्यवहारासाठी आणलेली ४० लाखांची रोकड बँकेच्या दारातूनच कर्मचाऱ्यास शस्त्राचा धाक दाखवत दिवसाढवळ्या चोरट्यांनी लुटल्याची घटना ३ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घडली.
सेनगावातील आजेगाव रस्त्यावर स्टेट बँक आॅफ हैदराबादची शाखा आहे. तेथे हिंगोली येथून दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी कर्मचारी रोकड आणतात. बुधवारी आठवडी बाजाराच्या दिवशी बँक कर्मचारी आश्विनी जायभाये, सेवक गणेश हनुमानदास चंदेल, चालक राजेंद्र गाढवे हे एम. एच. ३८ ६०४५ या क्रमांकाच्या कारने ४० लाखांची रोकड घेवून सेनगाव येथे बँकेसमोर दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी दाखल झाले. तेव्हा दरोडेखोरांनी सिनेमास्टाईल एन्ट्रि करीत गाडीला घेराव घेतला. यात महिला कर्मचारी आश्विनी जायभाये व सेवक गणेश चंदेल हे भांबावून गेले. दरोडेखोरांनी सेवक चंदेल यांच्या हातावर चाकूचे वार करीत पैशाची पेटी गाडीतून हिसकावून नेली. तर बँकसमोर असलेल्या गर्दीतॅन कोणाला काही कळण्याच्या आतच बनावट नंबर असलेल्या एम. एच.३८, २३७ या चारचाकी वाहनात बसून आजेगावच्या दिशेने पळ काढला. या घटनेची सेनगाव पोलिसांना खबर देण्यात आली. मात्र पोलिसांच्या अगोदरच शहरातील तरुण, पत्रकार हे दरोडेखोर पळालेल्या दिशेने मिळेत त्या वाहनाने पाठलाग करत होते. सेनगाव पोलिस ठाण्याचे पोनि सुनील रसाळ यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता क्षणाचाही विलंब न करता वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. तसेच दरोडेखोरांचा पाठलाग सुरु केला. दरोडेखोरांनी आजेगावमार्गे वाघजाळी, म्हाळशी या रस्त्याने भरधाव वेगाने शेगाव खोडके शिवार गाठला. ते दरोड्याच्या रकमेसह विदर्भात पळून जाण्याच्या तयारीत होते. परंतु पोलिसांनी या मार्गावरील ग्रामस्थांना मोबाईलद्वारे घटनेची माहिती देत आपल्या गावाच्या दिशने दरोडेखोर आल्याची कल्पना दिली. तेव्हा शेगाव खोडके येथील जागरुक ग्रामस्थांंनी तर रस्त्यावर बैलगाडीच आडवी लावली. काही वेळानंतर दरोडेखोरांची गाडी आली. रस्त्यात लावलेल्या बैलगाडीमुळे पुढील मार्ग बंद असल्याचा अंदाज बांधत घाबरलेल्या दरोडेखोरांनी तेथेच जीप सोडून रकमेसह पळ काढला. मात्र सेनगावहून आलेल्यांसह शेगाव खोडके, म्हाळशीच्या ५०० वर ग्रामस्थ दरोडेखोरांचा पाठलाग करीत होते. दरोडेखोर पुढे व ग्रामस्थांसह पोलिस त्यांच्या मागे अशा पद्धतीने तब्बल दोन तास तीन चार किमीचा शिवार तुडविला. पकडले जाण्याच्या भीतीने काही अंतरावर चोरट्यांनी दरोड्यातील ऐवजाचे पोते फेकून देत पुढे पलायन केले. परंतु पाठलाग करणाऱ्यांनी पैशांचे पोते ताब्यात घेतले तरीही पाठलाग सुरुच ठेवला. संततधार पावसामुळे शेतात पाय फसत होते. यात पिकेही आडवी होत होती. परंतु दरोडेखोर हातचे जावू द्यायचे नाही, या इरेला पेटलेल्या लोकांनी म्हाळशी शिवारापर्यंत पाठलाग केला. शेवटी दरोडेखोरांनी पोलिस व ग्रामस्थांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. यावेळी पोलिस कर्मचारी खंडेराव नरोटे, वाघमारे हे दोघे गोळीबारातून बालंबाल बचावले. गोळीबारानंतर घाबरलेले ग्रामस्थ पांगले, परंतु काहींनी न डगमगता पाठलाग सुरुच ठेवला. तब्बल दोन तासांच्या नाट्यानंतर आरोपी हाती लागले. ते हाती लागताच ग्रामस्थांनी बेदम मारहाण करीत गोळीबाराची भडास काढली. नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. यात तिन्ही दरोडेखोर गंभीर जखमी झाले. या सर्व गदारोळात मात्र एक दरोडेखोर फरार झाला. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ, उपधीक्षक प्रसन्न मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि मारोती थोरात आदींनी भेट दिली. यावेळी ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांची राजेंद्रसिंग महेपालसिंग बावरी (२५) रा. बडनेरा, जि. अमरावती, बाशासिंग अजबसिंग टाक (३०) रा. वडाळी, जि. अमरावती व जनार्धन रामराव वाघमारे (३५) रा. भांडेगाव, ता. जि. हिंगोली असे असून फरार अरोपींची नावे अजून समजू शकली नाहीत.

भीती : दरोडेखोरांनी केल्या तीन फायर
जेव्हा दरोडेखारांचा पाठलाग सुरु होता तेव्हा मोठा जमाव आपला पाठलाग करत असल्याने, देरोडेखोर चांगलेच भयभीत झाले होते. जवळापास तीन ते चार किमी चिखलाच्या दलदलीत हा थरार सुरु असल्याने, पाठलाग करणाऱ्यांना भय निर्माण व्हावे यासाठी दरोडेखोरांनी बंदुकीच्या तीन फायर केल्या.
त्यांना पैशाचे पोते फेकून दिल्यानंतर वाटले ग्रामस्थ पाठलाग थांबवतील परंतु पाठलगा कायम होता. तेव्हा घाबरलेले दरोडेखोर ग्रमास्थांतून बचाव करण्यासाठी खाकी वर्दी असलेल्या पोलिसांचा सहारा घेत होतेू.

पिस्तूल जप्त
आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, तीन खंजिर, एक वाहन जप्त केले आहे. चोरी गेलेल्या ४0 लाखांपैकी ३९ लाख जप्त केले असून एक लाख गायब आहेत. तीन आरोपीही फरार आहेत.

Web Title: After three hours of tremors in Hingoli, the robbery is trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.