उदयनिधी स्टॅलिन यांच्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं सनातन धर्माबाबत परखड मत, म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 01:31 PM2023-09-04T13:31:36+5:302023-09-04T13:43:37+5:30
Prakash Ambedkar: उदयनिधी स्टॅलिन यांच्या या विधानानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सनातन धर्माबाबत परखड मत मांडलं आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची डेंग्यूशी तुलना केल्याने देशात वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांच्या या विधानानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सनातन धर्माबाबत परखड मत मांडलं आहे.
सोशल मीडियावरे व्यक्त केलेल्या एका विधानामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सनातन धर्माबाबत आपलं मत मांडलं आहे. सनातन धर्म हा अस्पृश्यता पाळणारा आहे. मग त्याला आम्ही कसे काय स्वीकारणार? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. यावरून आता नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सनातन धर्म छुआछूत को मानता है.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 4, 2023
हम इसे कैसे स्वीकार करें!?
Sanatan Dharma believes in untouchability.
How can we accept Sanatan Dharma!?#SanatanaDharma
दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, सनातन हे नाव संस्कृतमधून आहे. सनातनचा अर्थ काय? तो शाश्वत आहे. म्हणजे तो बदलता येत नाही. कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. ते म्हणाले की, सनातनने जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडली. ते म्हणाले की, सनातनने स्त्रियांसाठी काय केले? त्यांनी पती गमावलेल्या स्त्रियांना आगीत ढकलले (पूर्वीची सती प्रथा). त्या काळात बालविवाहही झाले; पण द्रमुक सरकारने महिलांना बसमध्ये मोफत प्रवास दिला. विद्यार्थिनींना त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी १००० रुपये महिन्याला मदत दिली, असे त्यांनी म्हटले होते.