रक्ताने चिठ्ठी लिहील्यानंतर युवकाची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2016 07:17 PM2016-10-01T19:17:59+5:302016-10-01T19:17:59+5:30
उमरी येथील एका युवकाने स्वत:च्या रक्ताने चिठ्ठी लिहून नंतर रेल्वेखाली उडी घेउन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १ - उमरी येथील एका युवकाने स्वत:च्या रक्ताने चिठ्ठी लिहून नंतर रेल्वेखाली उडी घेउन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या युवकाच्या खिशातून रक्ताने लिहीलेली चिठ्ठी आणि ब्लेडचे धारदार पान जप्त केले आहे.
उमरी येथील रहिवासी सागर बाहकार या युवकाने शुक्रवारी दुपारी उमरी परिसरातच रेल्वेखाली उडी घेउन आत्महत्या केली. तत्पुर्वी सागरने रक्ताने एक चिठ्ठी लीहिली .यामध्ये त्याने रियली सॉरी म्हटले आहे. एका मुलीचे व एका मुलाचा या चिठ्ठीत उल्लेख करण्यात आला. या तिघांचीही माफी मागून सागरने रेल्वेखाली उडी घेतली.
पोलिसांना सदर चिठ्ठी सागरच्या खिशात आढळली. सागरने स्वत:च्या रक्ताने ही चिठ्ठी लिहीली. त्याच्या जवळ रक्ताने माखलेले ब्लेडही पोलिसांना आढळले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. सिव्हील लाईन्स पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.सागरच्या आत्महत्येला प्रेम प्रकरणाची किनार असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
चिठ्ठीमध्ये असा उल्लेख
पोलिसांनी घटनास्थळावरून सागरच्या खिशातून जप्त केलेल्या चिठ्ठीत सागर, आणि एका मुलीचे नाव लिहील्यानंतर रियली सॉरी, असा उल्लेख आहे. सागरने हे वाक्य रक्ताने लिहीले असल्याचे स्पष्ट झाले आहे. शरीराच्या ज्या भागावर रक्ताने कापून हे लिहीले त्या भागाची पाहणी पोलिसांनी केली.
प्रेम प्रकरणाची किनार
सागर बाहकार याने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. सागरच्या खीशात आढळलेल्या चिठ्ठीवरुन हे प्रकरण प्रेमातुनच झाल्याचे स्पष्ट झाले.