पुणे मेट्रोच्या मार्गात पुन्हा अडथळा
By admin | Published: January 2, 2017 03:47 PM2017-01-02T15:47:42+5:302017-01-02T15:53:28+5:30
हरित न्यायाधीकरणाने वनाझ ते रामवाडी या पुणे मेट्रोच्या मार्गातील नदीपात्रातील बांधकामाला अंतरिम स्थगिती दिल्याने मेट्रोच्या कामात पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 2 - अनेक अडथळ्यांचा डोंगर पार करीत अखेर पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असतानाच हरित न्यायाधीकरणाने वनाझ ते रामवाडी या मेट्रोच्या मार्गातील नदीपात्रातील बांधकामाला अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे मेट्रोच्या कामात पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. या याचिकेची पुढील सुनावणी २५ जानेवारी रोजी होणार आहे.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाझ ते रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट या दोन मार्गांवरून मेट्रो धावणार आहे.
वनाझ ते रामवाडी हा मार्ग १४ किमी लांबीचा आहे. त्यापैकी केवळ डेक्कन ते डेंगळे पुलापर्यंतच्या १.७ किमीचा मार्ग नदीपात्रातून जात आहे. मेट्रो मार्ग नदीपात्रातून नेला जाऊ नये यासाठी खासदार अनु आगा, सारंग यादवाडकर, आरती किर्लोस्कर यांनी हरित न्यायाधीकरणापुढे याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती यु. डी. साळवी व डॉ. अजय देशपांडे यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीत नदीपात्रात मेट्रोचे कोणतेही बांधकाम करण्यास अंतरिम स्थगिती दिली.