भरकटलेले तारू पुन्हा किना-यावर

By admin | Published: September 29, 2014 07:40 AM2014-09-29T07:40:33+5:302014-09-29T07:40:33+5:30

खांद्यावरून ओढलेल्या कसल्याशा कळकट पिशव्या एका हाताने सावरत आणि दुसऱ्या हातातल्या उग्र अंमली पदार्थाची रुमालातली गुंडाळी

Against the stray star | भरकटलेले तारू पुन्हा किना-यावर

भरकटलेले तारू पुन्हा किना-यावर

Next

संकेत सातोपे, मुंबई
खांद्यावरून ओढलेल्या कसल्याशा कळकट पिशव्या एका हाताने सावरत आणि दुसऱ्या हातातल्या उग्र अंमली पदार्थाची रुमालातली गुंडाळी हुंगत हिंडणारी कोवळ्या वयात सुकलेली बालके मुंबईतील प्रत्येकच रेल्वे स्थानकात दिसतात़ खेळण्या-बागडण्याच्या वयात व्यसनांच्या आहारी गेलेली ही मुले कुठून येतात, दिवसभर काय करतात, त्यांना काही आगापीछा असतो का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतातही; पण त्याची समाधानकारक उत्तरे मात्र मिळत नाहीत़ संबंधित शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता यासंदर्भात अनेक धक्कादायक गोष्टी समजतात.
रेल्वे स्थानकांतील भटक्या मुलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या म्हणण्यानुसार, यातील काही मुले सावत्र आई-बापाच्या त्रासाला कंटाळून घरून पळालेली आहेत, कुणी अभ्यासात गती नाही म्हणून शिक्षकांच्या रोषाला घाबरून घर सोडले आहे, तर काही कुसंगतीमुळे या वाटेवर भरकटले आहेत़ घरच्या जाचातून सुटण्यासाठी निवडलेली वाट या मुलांना पुढे घातक व्यसनांच्या गर्तेत लोटते आणि त्यातूनच त्यांची वाटचाल गुन्हेगारीकडेही होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़ स्थानकांवर आढळणाऱ्या या भटक्या मुलांपैकी तब्बल ७० टक्के मुले गुन्हेगारीकडे वळतात, तर ३० टक्के बुट पॉलिश, कचरा वेचणे आदींसारखी कष्टाची कामे करतात, असेही पोलीस सांगतात़

Web Title: Against the stray star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.