वृद्ध शेतकरी दांम्पत्य जुंपले नांगरला

By Admin | Published: July 22, 2016 07:13 PM2016-07-22T19:13:28+5:302016-07-22T19:37:26+5:30

ट्रॅक्टर किंवा बैलाच्या साह्याने शेत नांगरणी करणेही परवडत नसल्याने एक वृद्ध दांम्पत्य चक्क नांगरला जुंपले आहेत. शेतीसाठी बैलच नसल्याने आणि ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करणेही

Aged farmer married to a married couple | वृद्ध शेतकरी दांम्पत्य जुंपले नांगरला

वृद्ध शेतकरी दांम्पत्य जुंपले नांगरला

googlenewsNext

- संदीप भालेराव,

नाशिक, दि. 22 -  ट्रॅक्टर किंवा बैलाच्या साह्याने शेत नांगरणी करणेही परवडत नसल्याने एक वृद्ध दांम्पत्य चक्क नांगरला जुंपले आहेत. शेतीसाठी बैलच नसल्याने आणि ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करणेही आर्थिकदृट्या परवडत नसल्यामुळे हे दांम्पत शेतात राबत आहे. साधारणपणे साठीच्या पुढे वयोमान असलेले हे दांम्पत्य बैलाच्या जागी जुंपून नांगर ओढत आहे. नाशिकपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील शिवनई गावच्या शिवारात हे अल्पभुधारक शेतकरी शेतात राबत आहे.
आधुनिक पद्धतीच्या शेतीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवल्याची आकडेवारी शासकीय पातळीवर दिली जात असली तरी अल्पभुधारक शेतकऱ्यांना मात्र अजूनही पारंपरिक पद्धतीनेच शेती करावी लागत असल्याचे हे वास्तव आहे. शेतीची कामे आता आधुनिक पद्धतीने होऊ लागली आहेत. त्यामुळे बैलांचा वापर कमी झाला आहेच शिवाय दुष्काळी परिस्थितीमुळे बैलांचा सांभाळ करणेही कठिण झाल्यामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. या शेतकऱ्यांकडे बैल नसल्यामुळे आणि दुसऱ्याचे बैल किंवा ट्रॅक्टर भाड्याने आणणेही परवडत नसल्यामुळे हे दांम्पत्य स्वता:च नांगर ओढत आहे. भुईमुगाचे पीक घेण्यासाठी आजोबा नांगर ओढतात तर त्यांच्या पत्नी या पाठीमागून नांगर घेऊन चालतात.
पावसाच्या रिमझिम सरीत आणि मजलदर मजल करीत या दांम्पत्याने अर्धेहून अधिक शेत नांगरले आहे. भुईमुगाची लागवड करण्यासाठी भल्या पहाटे हे दांम्पत्य शेतावर येतात आणि दिवसभर नांगरला जूपून शेत नांगरणी करतात. शहराच्या अगदी जवळ शेती असूनही शेतीसाठी कुणाचीही मदत मिळत नसल्यामुळे पारंपरिक पद्धतीने हे दांम्पत्य शेती कामात गुंतल्याचे दिसते.

Web Title: Aged farmer married to a married couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.