शिक्षणप्रणालीत दिसणार संघाचा ‘अजेंडा’

By admin | Published: January 16, 2015 01:04 AM2015-01-16T01:04:50+5:302015-01-16T01:04:50+5:30

देशातील शिक्षणप्रणालीत भारतीय पारंपरिक मूल्यांना समाविष्ट करण्याच्या संघ परिवाराच्या भूमिकेबाबत केंद्र सरकारकडून विचार सुरू आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ.रामशंकर कठेरिया

'Agenda' to be seen in education system | शिक्षणप्रणालीत दिसणार संघाचा ‘अजेंडा’

शिक्षणप्रणालीत दिसणार संघाचा ‘अजेंडा’

Next

मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांचे संकेत : पारंपरिक मूल्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा विचार
नागपूर : देशातील शिक्षणप्रणालीत भारतीय पारंपरिक मूल्यांना समाविष्ट करण्याच्या संघ परिवाराच्या भूमिकेबाबत केंद्र सरकारकडून विचार सुरू आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ.रामशंकर कठेरिया यांनी गुरुवारी उपराजधानीत यासंदर्भात सूतोवाच केले. ही मूल्ये निरनिराळ्या शिक्षणशाखांच्या अभ्यासक्रमात आणण्यात काहीच गैर नाही. यासाठी आम्ही प्रयत्न करू असे वक्तव्य त्यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अत्याधुनिक व्यायामशाळेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पुनरुत्थान विद्यापीठाच्या वतीने नागपुरात अखिल भारतीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. देशातील शिक्षणक्षेत्रात बदलांची आवश्यकता असून भारतीय पारंपरिक मूल्यांचा त्यात जास्तीत जास्त प्रमाणात अंतर्भाव करण्यात यावा असा सूर यात उमटला होता. यावेळी संघ परिवारातील निरनिराळ््या संघटनांसह सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील या मुद्याच्या समर्थनार्थ भाष्य केले होते.
यासंदर्भात डॉ.कठेरिया यांना विचारणा करण्यात आली असता या विचारांमध्ये काहीच गैर नसल्याचे ते म्हणाले. भारतीय परंपरा आणि विचारपद्धती टिकविणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. संघाने मांडलेली भूमिका अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.
धर्मरक्षेसाठी करावा शक्तीचा संचय
विद्यापीठाच्या कार्यक्रमप्रसंगी डॉ.कठेरिया यांनी उपस्थितांना व्यायामाचे महत्त्व समजावून सांगितले. परंतु यावेळीदेखील त्यांचा रोख धर्मावरच होता. धकाधकीच्या जीवनात आरोग्य अन् शक्ती मिळविण्यासाठी व्यायाम आवश्यकच आहे. या शक्तीचा संचय धर्मरक्षेसाठी तसेच समाजाच्या विकासासाठी करावा असे ते म्हणाले.
‘बेसिक’ सुधारायला हवे
देशातील बहुतांश राज्यांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणित तसेच इतर विषयांचे ‘बेसिक’ कच्चे असल्याची बाब निरनिराळ््या सर्वेक्षणातून समोर येत आहे. ही नक्कीच चिंतेची बाब असून यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Web Title: 'Agenda' to be seen in education system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.