डबेवाले, चर्मकार समाजासाठी घरे; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 08:32 AM2024-09-14T08:32:35+5:302024-09-14T08:33:29+5:30
प्रत्येकी ५०० चौरस फूट आकाराचे घर केवळ २५ लाख रुपयांत दिले जाईल. आपले डबेवाले जागतिक पातळीवर ख्यातीप्राप्त आहेत.
मुंबई - मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजबांधवांसाठी १२ हजार घरांची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी शुक्रवारी विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून डबेवाल्यांचे ६० वर्षांपासूनचे स्वप्न येत्या तीन वर्षांत साकार होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेत ही घरे बांधली जाणार असून म्हाडाने यासाठी पुढाकार घेतला. ठाणे शहरानजीक १२ हजार घरांची निर्मिती होणार असून, ती डबेवाले आणि चर्मकार समाजातील बांधवांसाठी असतील. प्रत्येकी ५०० चौरस फूट आकाराचे घर केवळ २५ लाख रुपयांत दिले जाईल. आपले डबेवाले जागतिक पातळीवर ख्यातीप्राप्त आहेत. वारकरी वारसा तसेच तत्त्व आणि निष्ठा त्यांनी कधीही ढळू दिल्या नाहीत असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
🏠 डब्बेवाल्यांना मिळणार हक्काची 12000 घरे 🏠
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 13, 2024
🔸MoU for 12000 houses in Mumbai for Dabbawalas and the Charmakar community
🔸मुंबई डब्बेवाला आणि चर्मकार समाज यांच्या हक्काच्या 12000 घरांसाठी सामंजस्य करार
🔸मुंबई डब्बेवाला और चर्मकार समाज इनके हक के 12000 घरों के लिए समझौता… pic.twitter.com/Qbic8qJQNS
‘सह्याद्री’वर समारंभ
सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला जयेश शाह, रुद्रप्रताप त्रिपाठी, आ. श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड उपस्थित होते.