मराठवाडा वॉटर ग्रीडबाबत इस्रायलशी करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 05:56 AM2018-02-22T05:56:09+5:302018-02-22T05:56:11+5:30
मराठवाड्यातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन व इस्रायल सरकार अंगीकृत कंपनी मे. मेकोरोट यांच्यामध्ये बुधवारी मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत सर्वंकष करार झाला.
मुंबई : मराठवाड्यातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन व इस्रायल सरकार अंगीकृत कंपनी मे. मेकोरोट यांच्यामध्ये बुधवारी मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत सर्वंकष करार झाला.
करारावर मे. मेकोरोटचे चेअरमन मोरडेखाई व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, विकासचंद्र रस्तोगी यांनी करारावर स्वाक्षºया केल्या.
कराराच्या अनुषंगाने मे. मेकोरोट मराठवाड्यातील उपलब्ध पाणीसाठे, पर्जन्यवृष्टी, भूस्तर रचना, भूजलाची पातळी, पाणीसाठा, वाहून जाणारे पाणी, उपलब्ध पाणी याचा समग्र अभ्यास करून शाश्वत पाणीपुरवठा करण्याचा मास्टर प्लान तयार करून, त्याबाबतचा प्राथमिक संकल्प अहवाल सादर करणार आहे. डिसेंबर २०१८ अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.