कृषी केंद्रांनी बियाणे उचललेच नाही!

By admin | Published: May 17, 2017 02:53 AM2017-05-17T02:53:22+5:302017-05-17T02:53:22+5:30

महाबीज, कंपन्यांनी केले बियाण्यांचे नियोजन : शेतकऱ्यांची खरेदी शून्य!

Agricultural centers did not pick up the seeds! | कृषी केंद्रांनी बियाणे उचललेच नाही!

कृषी केंद्रांनी बियाणे उचललेच नाही!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) ६ लाख ५३ हजार क्ंिवटल विविध बियाण्यांचे नियोजन केले असून, खासगी बियाणे कंपन्यांनीही बियाण्यांची तजवीज केली आहे; परंतु कृषी विक्रेता व्यावसायिक संघाने अद्याप बियाण्यांची उचल केली नाही. रासायनिक खतांच्या साठ्याचीही तीच स्थिती आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना यावर्षी बियाणे बाजारात शुकशुकाट आहे.
राज्यात १ कोटी ४० लाख हेक्टरवर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यादृष्टीने महाबीजने बियाण्यांचे नियोजन केले असून, खासगी कंपन्यांनीही बियाणे तयार केले आहे. महाबीजने गतवर्षी ५ लाख १२ हजार क्ंिवटल बियाण्यांचे नियोजन केले होते. यावर्षी ६ लाख ५३ हजार क्ंिवटल बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांची गरज व मागणी बघता महाबीजने पाच लाख तीन हजार क्ंिवटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले आहे. गतवर्षी हे बियाणे ४ लाख ५ हजार क्ंिवटल एवढेच होते. तुरीचे बियाणे गतवर्षी १३ हजार क्ंिवटल शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले होते. यावर्षी १८ हजार क्ंिवटल तूर बियाणे उपलब्ध केले आहे. उडीद १३,५०० क्ंिवटलवरू न १६ हजार ५३० क्ंिवटल, मूग बियाणे गतवर्षी २,२०० क्ंिवटल होते. ते यावर्षी पाच हजार क्ंिवटल आहे. धान गतवर्षी ६६ हजार क्ंिवटल बियाण्याचे नियोजन करण्यात आले होते. यावर्षी ८५ हजार क्ंिवटल नियोजन आहे. ज्वारीचे ६ हजार ५०० क्ंिवटलचे बियाणे उपलब्ध करण्यात आले आहेत. दरम्यान, यावर्षी बियाण्यांच्या मुबलकतेसह विविध रासायनिक खतांचा साठा मुबलक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांसाठी यावर्षी अतिरिक्त खतसाठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील तीन वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत सव्वालाख मेट्रिक टन जास्त म्हणजेच ५ लाख ७९ हजार मेट्रिक टन खताचा हा साठा आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ११ हजार मेट्रिक टन खते प्रत्यक्षात उपलब्ध झाले आहेत.

कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी पूरक बियाणे उचलले नसून, शेतकऱ्यांकडून अद्याप बियाण्यांची मागणी नाही. पाऊस आल्यावरच बियाण्यांची खरेदीला वेग येईल.
- प्रभाकर गावंडे, अध्यक्ष, जिल्हा कृषी विक्रेता संघ, अकोला.

यावर्षी पावसाळा वेळेवर असल्याने शेतकरी मशागतीच्या कामाला लागलेला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर बियाणे खरेदीला सुरुवात होईल. शेवटच्या आठवड्यात रोहिणी नक्षत्र सुरू होणार आहे.
- एस.आर. सरदार, विभागीय संयुक्त संचालक, कृषी विभाग, अमरावती.

Web Title: Agricultural centers did not pick up the seeds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.