कृषी विकास दर १२.५ टक्क्यांवर, कृषीमंत्र्यांचा दावा किती खरा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 05:27 AM2017-11-08T05:27:16+5:302017-11-08T05:27:30+5:30
राज्यात भाजपा सरकार आल्यापासून कृषी विकासासाठी विविध निर्णय घेण्यात आले. त्यामुळे राज्याचा कृषी विकास दर तीन वर्षांत शून्य टक्क्यावरून १२.५ टक्क्यांवर पोहोचल्याचा दावा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी केला.
मुंबई : राज्यात भाजपा सरकार आल्यापासून कृषी विकासासाठी विविध निर्णय घेण्यात आले. त्यामुळे राज्याचा कृषी विकास दर तीन वर्षांत शून्य टक्क्यावरून १२.५ टक्क्यांवर पोहोचल्याचा दावा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी केला.
मंत्रिमंडळासमोर कृषी विभागाच्या सादरीकरणावेळी फुंडकर यांनी तीन वर्षांत विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली.गेल्या तीन वर्षांत कृषीसंबंधी २२ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेतीसाठी चारशे कोटींचा निधी असतानाही भरीव कामगिरी करण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. ३००पेक्षा अधिक शेती गट स्थापन केले. उन्नत शेती, समृद्ध शेती योजनेवर अधिक भर दिला. वीस लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. त्यामुळे शेतकºयांचे उत्पादन वाढल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
कृषीमंत्र्यांचा दावा किती खरा?
तीन वर्षात कृषी विकासदर १२.५ टक्कयांवर आणल्याचा दावा कृषीमंत्र्यांनी केला असला तरी हा आकड्यांचा खेळ असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. २००९-२०१० पर्यंत राज्याचा कृषी विकास दर सरासरी १०.४६ टक्के एवढा होता, असे चेम्बर आॅफ कॉमर्सच्या एका अहवालात म्हटले आहे. सलग दोन वर्षे राज्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळ होता.