कृषी तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका रोखल्या!

By admin | Published: November 13, 2015 12:17 AM2015-11-13T00:17:59+5:302015-11-13T00:17:59+5:30

विदर्भातील कृषी तंत्रनिकेतनचा निकाल लागून दोन-अडीच महिने झाले असताना, या विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळाल्या नसल्याने विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका मिळण्यासाठी

Agricultural Polytechnic Student Marks! | कृषी तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका रोखल्या!

कृषी तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका रोखल्या!

Next

अकोला : विदर्भातील कृषी तंत्रनिकेतनचा निकाल लागून दोन-अडीच महिने झाले असताना, या विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळाल्या नसल्याने विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका मिळण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.
विदर्भातील ४६ खासगी कृषी तंत्रनिकेतनचा निकाल केवळ १२ टक्के लागला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत विदर्भात ४६ खासगी कृषी तंत्रनिकेतन असून, कृषी विद्यापीठाच्या यामध्ये ९ तंत्रनिकेतन शाळांचा समावेश आहे. गत तीन वर्षांपूर्वी शेतकी शाळेचे रू पांतर कृषी तंत्रनिकेतनमध्ये करण्यात आले असून, दोन वर्षांऐवजी तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमात करण्यात आला आहे. यंदा प्र्रथमच पहिल्या तुकडीचा निकाल लागला आहे. या ४६ कृषी तंत्रनिकेतनमधून जवळपास २७०० च्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Agricultural Polytechnic Student Marks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.