कृषी पंप थकबाकी १ हजार ९७ कोटी रुपयांवर!
By Admin | Published: July 4, 2016 04:11 AM2016-07-04T04:11:50+5:302016-07-04T04:11:50+5:30
शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी पंपांकरिता महावितरणकडून वीजपुरवठा उपलब्ध करून दिला जातो.
अतुल जयस्वाल,
अकोला- शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी पंपांकरिता महावितरणकडून वीजपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. यासाठी आकारण्यात येणारी देयके मात्र भरली जात नसल्याने याच्या थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळांतर्गत येत असलेल्या तीन जिल्ह्यांमध्ये तब्बल १ हजार ९७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये अडीच लाखांवर कृषी पंपधारक असून, त्यापैकी २ लाख ४३ हजार ग्राहकांकडे तब्बल १ हजार ९७ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांना दर तीन महिन्यातून एकदा विद्युत देयक पाठविले जाते. गत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांकडून वीज देयकांचा भरणा करण्याची गती मंदावली आहे. त्यामुळे कृषी
पंपांच्या थकबाकीचा आकडा वाढतच आहे. (प्रतिनिधी)