दुर्गम भागात कृषी तंत्रज्ञान प्रसार !
By Admin | Published: January 30, 2016 02:17 AM2016-01-30T02:17:01+5:302016-01-30T02:17:01+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विदर्भात पीक व्यवस्थापनावर भर.
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने यावर्षी विदर्भातील अकरा जिल्हयात एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार प्रकल्प राबविण्यात येत असून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत राबविण्यात येणार्या या प्रकल्पातंर्गत विविध पिकांच्या उत्पादन वाढीवर भर देण्यात येत आहे. दुर्गम भागातील शेतावर या प्रकल्पातंर्गत शेतकर्यांना पीक व्यवस्थापनाची माहिती देण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत २0१५-१६ यावर्षी हा प्रकल्प राबविण्यासाठी अनुदान उपलब्ध करू न देण्यात आले असून, या योजनेतंर्गत विविध कृषीविषयक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. कृषी विभागातंर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतीपुढील आव्हाने बघता, शेतकर्यासाठींच्या योजनेवर अधिक भर देण्यात आला असून, कृषी विद्यापीठामार्फत पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यावर भर देण्यात आला आहे. विदर्भातील ११ जिल्हयातील कृषी विद्यापीठाची कृषी विज्ञान केंद्र या योजनेत महत्वाची भूमिका बजावणार असून, या केंद्राअंतर्गत प्रत्यक्ष शेतावर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासोबतच कृषी महाविद्यालय नागपूर, प्रादेशीक संशोधन केंद्र अमरावती तसेच कृषी विद्यापीठाच्या वाशिम येथील कृषी संशोधन केंद्रांचा समावेश करण्यात अला आहे. सध्या या ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यास सुरू वात करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे व राज्य शासनाने या प्रकल्पाची आखणी केली असून, दुसर्या टप्प्यात तंत्रज्ञान प्रसार प्रकल्पावर अधिक भर देण्यात येत आहे. विदर्भातील शेतकर्यांनी तंतोतत शेती करू न,पीक उत्पादन वाढ करावी,यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विस्तार शिक्षण विभाग जोमाने कामाला लागला आहे. या संचालनालयांतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्रांतर्गत हा कार्यक्रम दुर्गम भागात राबविण्यात येत आहे.