कृषी विद्यापीठाचे पीक विमा ‘मॉडेल’

By admin | Published: May 12, 2014 12:17 AM2014-05-12T00:17:30+5:302014-05-12T00:20:15+5:30

शेतकर्‍यांना लाभ, कृषिशास्त्र विभागाचा अभ्यास

Agricultural University's Crop Insurance Model | कृषी विद्यापीठाचे पीक विमा ‘मॉडेल’

कृषी विद्यापीठाचे पीक विमा ‘मॉडेल’

Next

अकोला- सातत्याने पीक उत्पादनात येणारी अनियमितता भरुन काढण्यासाठी राष्ट्रीय पीक विमा योजना शेतकर्‍यांना फायदेशीर ठरत असल्याचा निष्कर्ष डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्रज्ञांनी काढला आहे. या कृषी अर्थशास्त्रज्ञांनी याकरिता पीक विमा धारण करणार्‍या जवळपास दोन हजार शेतकर्‍यांचा अभ्यास करून एक ह्यमॉडेलह्णच तयार केले आहे. नवीन प्रारूप आराखड्यानुसार १९९९ ते २000 पासून राज्यात रब्बी पिकांसाठी राष्ट्रीय पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना पिकांची नुकसानभरपाई देण्यात येत आहे .या अनुषंगाने कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाचे डॉ.श्यामकांत जहागीरदार व मनोज मोहोड यांनी अकोला जिल्हय़ातील आकोट आणि बाश्रीटाकळी तालुक्यातील हरभरा पिकासाठी पीक विमा काढणार्‍या शेतकरी गटांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासात त्यांना शेतकर्‍यांना नुकसानभरपाईची हमी मिळाल्याचे दिसून आले आहे. शेतकर्‍यांना मिळालेली उत्पादकता, उंबरठा उत्पन्न, पीक विम्याचा भरलेला हप्ता तसेच नुकसानभरपाई हमी उत्पादकता, या बाबींचा यात विचार करण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी हरभरा पिकासाठी प्रतिहेक्टर एकूण केलेला खर्च परिव्यव (क) प्रतिहेक्टरचा यामध्ये अभ्यास करण्यात आला आहे. त्यासाठी ५१६ अल्पभूधारक, १0५0 मध्यभूधारक व ३१४ मोठय़ा शेतकर्‍यांचा समावेश करण्यात आला होता. या शेकर्‍यांकडे बारमाही पाण्याची व्यवस्था नगण्य असल्याचे दिसून आले. या शेतकर्‍यांनी केलेला खर्च परिव्यव (क) आणि मिळालेले प्रतिहेक्टरी नगदी उत्पादन यामध्ये तफावत आढळून आली. प्रथमदर्शनी हरभरा पीक घेणार्‍या शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. या शेतकर्‍यांनी प्रतिहेक्टरी पीक विम्याचा हप्ता ३४0.१0 रुपये भरला होता. त्यामुळे प्रत्यक्ष झालेले नुकसान व श्रममूल्य भरपाईसाठी हे शेतकरी पात्र ठरले. केवळ पीक विमा योजनेत सहभागी झाल्यामुळे या शेतकर्‍यांना भरपाई मिळाल्याचे अभ्यासकांना दिसून आले.

Web Title: Agricultural University's Crop Insurance Model

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.