शेतीला दिवसा विजेसाठी मोजावे लागणार रोजचे चार कोटी रुपये; स्वाभिमानीचा अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 06:19 AM2022-03-09T06:19:53+5:302022-03-09T06:20:03+5:30

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या मदतीनेच तयार केलेल्या प्रस्तावातून ही वस्तुस्थिती समोर आली आहे.

Agriculture has to pay Rs 4 crore daily for electricity; Swabhimani's report | शेतीला दिवसा विजेसाठी मोजावे लागणार रोजचे चार कोटी रुपये; स्वाभिमानीचा अहवाल 

शेतीला दिवसा विजेसाठी मोजावे लागणार रोजचे चार कोटी रुपये; स्वाभिमानीचा अहवाल 

Next

- नसीम सनदी 
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतीला दिवसा वीज पुरविण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करायची, तर महावितरणला खासगी कंपन्यांकडून रोज दोन हजार मेगावॅट वीज घ्यावी लागणार आहे. त्यासाठी दरदिवशी चार कोटी याप्रमाणे महिन्याला १२० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. 

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या मदतीनेच तयार केलेल्या प्रस्तावातून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. या प्रस्तावामुळे दिवसा वीज देणे आर्थिकदृष्ट्या व वहनक्षमता, निर्मितीच्या तुलनेत कितपत शक्य आहे, याचा आता नव्याने अभ्यास सुरू झाला आहे. आयआयटीच्या तज्ज्ञ समितीमार्फत या प्रस्तावावर आठ दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. 

सरकारला दिलेल्या या प्रस्तावात, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवायची, तर ५ हजार ६१९ मेगावॅट विजेच्या विभागणीचा आधी विचार करावा लागतो. १५ स्लाॅटमध्येच; पण पहाटे ४ ते रात्री ११ या वेळेत शेतीचे वेळापत्रक बसवता येते. शिवाय महावितरणची आहे ती यंत्रणादेखील ढेपाळणार नाही, हे आकडेवारीसह सिद्ध करून दाखविण्यात आले आहे. 
सध्या दिवसा २२ हजार मेगावॅट विजेची मागणी आहे, शेतीची त्यात भर टाकली, तर ती २८ हजार मेगावॅटपर्यंत जाईल.

शेतकऱ्यांसाठी २५० कोटी रुपये खर्च करणे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत कठीण असले तरी, अशक्य नाही. मंत्र्यांची दालने, त्यांच्यावरचा खर्च कमी केला, तर ही रक्कम उभी राहू शकते. शेतकऱ्यांसाठी म्हणून सरकारने हा भार उचलायला हवा.    - राजू शेट्टी, माजी खासदार

Web Title: Agriculture has to pay Rs 4 crore daily for electricity; Swabhimani's report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी