शेती, उद्योग, पाण्याच्या दरात वाढ : घरगुती दरवाढीचा निर्णय पालिकांच्या हाती; जलसंपदा प्राधिकरणाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 05:00 AM2018-01-20T05:00:44+5:302018-01-20T05:00:47+5:30
शेती, उद्योग आणि घरगुती वापरासाठी जलसंपदा विभागातर्फे पुरविण्यात येणाºया पाण्याचे दर १ फेब्रुवारीपासून वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपदा प्राधिकरणाने शुक्रवारी घेतला
मुंबई : शेती, उद्योग आणि घरगुती वापरासाठी जलसंपदा विभागातर्फे पुरविण्यात येणाºया पाण्याचे दर १ फेब्रुवारीपासून वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपदा प्राधिकरणाने शुक्रवारी घेतला. घरगुती पाणी दरवाढीचा बोजा थेट ग्राहकांवर टाकायचा की नाही, याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आला आहे.
प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी.बक्षी आणि सदस्य व्ही.एम.कुलकर्णी यांनी दरवाढीची घोषणा केली. क्षमतेपेक्षा ११५ टक्के ते १४० टक्के जास्त पाणी वापरावर मानक दराच्या १.५० पट दर आकारला जाईल. पाणीवापर संस्थांची स्थापना करुन शेतकºयांनी पाणी घेतले तर प्रोत्साहन म्हणून पाणी दरात २५ टक्के सूट दिली जाईल. तसेच, सूक्ष्म सिंचनाचा वापर केल्यास २५ टक्के वेगळी सूट दिली जाईल.
ग्राम पंचायतींसाठी माणशी ४० लिटर मर्यादा ५५ लिटर केली आहे. क वर्ग पालिकांसाठी ही मर्यादा माणशी ७० लिटर, ब वर्ग पालिकांसाठी १०० लिटर, अ वर्ग पालिकांसाठी १२५ लिटर, ५० लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या महापालिकांसाठी १३५ लिटर तर मुंबई महापालिकेसाठी १५० लिटर इतकी असेल.
मिनरल वॉटर, बीअरही महागणार
मिनरल वॉटर, शीतपेये आणि बीअर उत्पादक कारखान्यांना पुरविण्यात येणाºया पाण्याच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. आधी त्यांच्याकडून एक हजार लिटरमागे १६ रुपये आकारले जात असत. आता १२० रुपये आकारले जाणार आहेत.