मराठवाड्यातील पीक-पाणी व परिस्थितीचा कृषीमंत्री धनंजय मुंडे घेणार आढावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 09:52 AM2023-08-25T09:52:59+5:302023-08-25T09:54:33+5:30

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हेही या बैठकीस व्हर्च्युअली उपस्थित राहणार असून मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातील मंत्रीही या बैठकीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Agriculture Minister Dhananjay Munde will review the crop-water situation in Marathwada! | मराठवाड्यातील पीक-पाणी व परिस्थितीचा कृषीमंत्री धनंजय मुंडे घेणार आढावा!

मराठवाड्यातील पीक-पाणी व परिस्थितीचा कृषीमंत्री धनंजय मुंडे घेणार आढावा!

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर :  राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे सध्या मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पीक पाणी व पावसाच्या एकूण परिस्थितीचा शुक्रवारी आढावा घेणार आहेत. 

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हेही या बैठकीस व्हर्च्युअली उपस्थित राहणार असून मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातील मंत्रीही या बैठकीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव या आठही जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण, ओढ दिलेल्या क्षेत्रात पिकांची परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा देण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आदी सर्वच विषयांवर व्यापक चर्चा व निर्णय होणे या बैठकीत अपेक्षित आहे. 

या बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, यांच्यासह अन्य मंत्री, तसेच विभागीय आयुक्त, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी आयुक्त, तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष किंवा व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Agriculture Minister Dhananjay Munde will review the crop-water situation in Marathwada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.