फवारणीच्या चिनी स्प्रेमुळे शेतक-यांचा जीव धोक्यात - कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 08:12 PM2017-10-03T20:12:48+5:302017-10-03T20:13:23+5:30

कापसावरील किटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे विदर्भातील १८ शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी दिली.

Agriculture Minister Pandurang Phundkar said that the spraying of Chinese spray of the life threatens the lives of the farmers | फवारणीच्या चिनी स्प्रेमुळे शेतक-यांचा जीव धोक्यात - कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर   

फवारणीच्या चिनी स्प्रेमुळे शेतक-यांचा जीव धोक्यात - कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर   

Next

मुंबई - कापसावरील किटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे विदर्भातील १८ शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी दिली. विषबाधाप्रकरणात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्याचेही कृषीमंत्र्यांनी यावेळी मान्य केले. 
विदर्भात विशेषत: यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे १८ शेतक-यांचा मृत्यू झाला. तर, ५४६ शेतकरी अत्यवस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कृषीमंत्री फुंडकर म्हणाले की, विषबाधेची घटना दुर्देवी आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विदर्भातील कडक उन्हामुळे पिकांवरील फवारणी करताना शेतकरी अनेकदा मास्क किंवा कोट न घालताच फवारणी करतात. त्यातच चिनी बनावटीचे स्प्रेने फवारणी करताना शेतक-यांच्या अंगावरच किटकनाशकाचा फवारा येतो आणि विषबाधा होते, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले. 
मात्र, विषबाधेच्या या प्रकरणात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्याचेही कृषीमंत्र्यांनी मान्य केले. गेल्या काही दिवसांपासून विषबाधेमुळे अनैसर्गिक मृत्यू होत असल्याची बाब पोलिसांना किंवा जिल्हा प्रशासनाला माहिती नव्हती. शिवाय, यवतमाळ जिल्हत सोय असतानाही रुग्णांना उपचारांसाठी नागपूरला पाठविण्यात आले. नागपूरातील सरकारी रूग्णालयातील उपचारादरम्यान रूग्णांना बाहेरून औषधे आणि रक्त तपासणीचे अहवाल आणण्यास सांगण्यात आले. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल. 
या प्रकरणातील शेतक-यांना कोणत्या कृषी केंद्रावरुन किटकनाशकांचा पुरवठा झाला, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले होते का, याची चौकशी केली जाईल. या दुर्घटनेत किटकनाशक कंपन्या जबाबदार असल्याच त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे फुंडकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Agriculture Minister Pandurang Phundkar said that the spraying of Chinese spray of the life threatens the lives of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.