उदयोग व सेवांशी जोडल्यास कृषी क्षेत्रात बदल शक्य - देवेंद्र फडणवीस

By admin | Published: September 11, 2016 07:13 PM2016-09-11T19:13:30+5:302016-09-11T19:13:30+5:30

शेतकऱ्यांचा विकास साधायचा असेल, तर कृषी क्षेत्राला उदयोग वसेवांशी जोडणे आवश्यक आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव आणि मध्यस्थांची साखळी तुटेल.

Agriculture sector can be changed if connected to industries and services - Devendra Fadnavis | उदयोग व सेवांशी जोडल्यास कृषी क्षेत्रात बदल शक्य - देवेंद्र फडणवीस

उदयोग व सेवांशी जोडल्यास कृषी क्षेत्रात बदल शक्य - देवेंद्र फडणवीस

Next

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. ११ : शेतकऱ्यांचा विकास साधायचा असेल, तर कृषी क्षेत्राला  उदयोग वसेवांशी जोडणे आवश्यक आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव आणि मध्यस्थांची साखळी तुटेल. हा बदल घडविण्यासाठी शासनाने इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कची योजना सुरु केलेली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. हिंगणघाटलगतच्या वणी येथील गिमाटेक्स कंपनीच्या आवारात विदर्भातील पहिल्या ३५० कोटींच्या इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन व गिमाटेक्सच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करीत होते.

व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून वित्त व नियोजन तथा वनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. रामदास तडस, हिंगणघाटचे आ. समीर कुणावार, वर्धाचे आ. डॉ. पंकज भोयर, गिमाटेक्सचे अध्यक्ष बसंत मोहता, व्यवस्थापकीय संचालक प्रशांत मोहता, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, अनुराग मोहता, विनीत मोहता विराजमान होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, उद्योगांच्या क्षेत्रात महाराष्ट्र सर्वाधिक सुलभता असणारे राज्य आहे. असे लिकान यु या जागतिक स्तरावरील मानांकन ठरविणाऱ्या संस्थेने म्हटले आहे. महाराष्ट्रात एका वर्षांत दीड लाख कोटींची गुंतवणूक झालेली असून ही देशातील सर्वाधिक गुंतवणूक आहे. राज्याच्या सकल उत्पनात शेतीचा वाटा ११ टक्के आहे. मात्र ४५ टक्के रोजगार निर्मिती होते. यामुळे कृषी क्षेत्राची अवस्था अशी आहे. कृषी क्षेत्र जोपर्यंत उद्योग आणि सेवा क्षेत्राशी जोडणार नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्रात बदल होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

फार्म टु फॅशन संकल्पना शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवेल  - सुधीर मुनगंटीवार
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी शासन फार्म टु फॅशन ही संकल्पना राबवित आहे. त्याचा प्रत्यय इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातूनआज येत आहे. हिंगणघाटसारख्या छोट्या शहरात इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कमुळे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उच्च गुणवत्तेच्या कापडांची निर्मिंती होईल, असा विश्वास  वित्त व नियोजन तथा वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सरकार लोकांसोबत आहे. ह्यहम आपके है कोनह्ण म्हणत नाही. ह्यहम साथ साथ हैह्ण म्हणत सर्वांना सोबत घेऊन हे सरकार पुढची वाटचाल करीत आहे. विदर्भात उद्योग आल्यास आनंद होतो. पूर्वी मुंबईतून निघालेला पैसा थेट बारामतीत जायचा. आता तो निघाल्यानंतर सुपर एक्स्प्रेस वे मार्गे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पोहचणार आहे, अशी कोटीही त्यांनी केली.

Web Title: Agriculture sector can be changed if connected to industries and services - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.