कृषी विद्यापीठे करणार महाबीजसोबत शेतावर बीजोत्पादन
By Admin | Published: November 25, 2015 01:53 AM2015-11-25T01:53:34+5:302015-11-25T01:53:34+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातही शेतक-यांसाठी बीजोत्पदन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू.
अकोला: शेतकर्यांनी स्वत: दज्रेदार बियाणे निर्मिती करण्यासाठी बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी राहुरीच्या महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठाने कार्यक्रम आखला असून, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळासोबत (महाबीज) शेतकर्यांच्या शेतावर बीजोत्पादन केले जाणार आहे. यापूर्वी गाव दत्तक योजनेच्या माध्यमातून ज्वारी ग्राम बीजोत्पादनाचा कार्यक्रम यशस्वी झाल्याने हे पाऊल टाकण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही शेतकर्यांना बीजोत्पदनासाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या प्रशिक्षणाकरिता साडेआठ लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. पश्चिम विदर्भातून या प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली असून, कृषी शास्त्रज्ञांना आता चांगल्या परिणामांची प्रतीक्षा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या शे तकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला. कापूस, तूर, मिरची, टोमॅटो आदी भाजी पाला, फळपिके तसेच सोयाबीन आणि ज्वारी या पिकांच्या बीजोत्पादनाची माहिती शेतकर्यांना पहिल्या टप्प्यात देण्यात आली आहे. यात बीज प्रमाणीकरणाची न्यूनतम मापके, उगवणशक्ती तपासणे, शुद्ध बियाणे विलगीकरण, बियाण्यांतील भेसळ ओळखण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण शेतकर्यांना देण्यात आले. यासाठी कृषी विद्यापीठाचे विविध विषयतज्ज्ञ शेतकर्यांना मार्गदर्शन करतात. या कृषी विद्यापीठानेही आदिवासी भागातील शे तकर्यांच्या क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला सोबत घेऊन मराठवाडा व पश्चिम, उत्तर महाराष्ट्रात महाबीजसोबत बीजोत्पादनाचा कार्यक्रम आखला असून, कृषी विद्या पीठाचे प्रक्षेत्र व शेतकर्यांच्या शेतावर हा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात राबविण्यात येणार आहे. शेतकर्यांना दोन पिके कशी घेता येतील, यावरही संशोधन सुरू असून, यावर्षीपासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे.