अँग्रो इको-टुरिझम हालचालींना वेग !

By Admin | Published: July 21, 2016 11:31 PM2016-07-21T23:31:00+5:302016-07-21T23:31:00+5:30

निधी मिळण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रस्ताव करणार सादर करणार.

Agro eco-tourism movements speed! | अँग्रो इको-टुरिझम हालचालींना वेग !

अँग्रो इको-टुरिझम हालचालींना वेग !

googlenewsNext

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अँग्रो-इको-टुरिझमची संकल्पना मांडली असून, लवकरच एका निसर्गरम्य ठिकाणी पर्यावरणपूरक पार्क साकारला जाणार आहे. याकरिता चार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने कृषी विद्यापीठातर्फे एक प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार आहे. या कामाला वेग आला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात आले होते. तथापि, ही जागा अकोला विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारात गेल्याने कृषी विद्यापीठाने नव्याने पर्याय शोधला असून, मत्स्य विभागाच्या १९ हेक्टर जागेवर अँग्रो टुरिझम सेंटर उभारण्यासंबंधी प्रस्ताव तयार केला आहे. अगोदरच्या पर्यटनस्थळाचे साहित्य तेथे नेण्यात आले आहे. लवकरच प्राथमिक स्वरू पाच्या कामाला सुरुवात केला जणार आहे. मत्स्य प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर घनदाट वृक्षवल्ली असून, या ठिकाणी तळ्य़ांचे साम्राज्य आहे. या ठिकाणाहून नदीवजा नाला आहे. येथे घनदाट वृक्षवल्ली असल्याने या भागात हरीण व इतर तत्सम प्राण्यांचादेखील वावर आहे. त्यामुळे जंगल सफारीचा आनंद पर्यटकांना लुटता येईल. या ठिकाणी मत्स्य तलाव व इतर मोठे तळे, नाला असल्याने बोटिंगची व्यवस्था निर्माण करण्यात येईल. या सर्व दृष्टीने कृषी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत.
अकोला व नजीकच्या पर्यटक-चाकरमान्यांना सुटीच्या दिवशी आनंद लुटण्यासाठी एकही स्थळ नसल्याने, हाच विचार करू न कृषी विद्यापीठाने अँग्रो इको-टुरिझम सेंटरची कल्पना मांडून हा प्रकल्प प्रत्यक्ष साकारण्याबाबत मागेच प्रस्ताव तयार केला असून, या ठिकाणी प्राथमिक स्वरू पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. विदर्भातील हे सुंदर अँग्रो टुरिझम व्हावे, याकरिता निधी उपलब्ध व्हावा, यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले असून, यासाठीचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येत आहे. याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत अकोलेकरांचे आहे.


- कृषी विद्यापीठाच्या मत्स्य संशोधन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर अँग्रो-इको-टुरिझमह्ण साकरले जात आहे. पर्यावरणपूरक पर्यटनस्थळाला व्यापक व सुंदर करण्यासाठी निधीची गरज असल्याने कुलगुरू डॉ. आर.जी. दाणी यांच्या माध्यमातून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येत आहे.
- डॉ. किशोर बिडवे,
कुलगुरूंचे तांत्रिक सचिव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Web Title: Agro eco-tourism movements speed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.