अहेरातून वर्षा जलसंचयन प्रकल्प
By admin | Published: May 9, 2016 04:10 AM2016-05-09T04:10:30+5:302016-05-09T04:10:30+5:30
सोलापुरातच्या बार्शी तालुक्यातील वैराग गावामधील तुळशीदास नगरात सचिन आणि प्रतीक्षा आतकरे यांचा विवाह सोहळा १६ एप्रिल रोजी संपन्न झाला
सोलापूर : सोलापुरातच्या बार्शी तालुक्यातील वैराग गावामधील तुळशीदास नगरात सचिन आणि प्रतीक्षा आतकरे यांचा विवाह सोहळा १६ एप्रिल रोजी संपन्न झाला. लग्नातील अहेरात मिळालेल्या पैशांचा मोह न बाळगता या नवदाम्पत्याने ते गावाच्या विकासासाठी खर्च केले. सचिन पुण्यातील आयटी कंपनीत अभियंता आहेत, तर प्रतीक्षा यांचे अभियांत्रिकीचे पदव्युतर शिक्षण सुरू आहे. त्यांच्या लग्नात नातेवाइकांकडून अहेराचे ३५ हजार रुपये जमले होते. त्यात त्यांनी स्वत:कडील १ लाख २५ हजार रुपयांची भर घातली आणि त्यातून गावातल्या घराघरांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम सुरू केले. गावातील किमान ५० घरांवर हा प्रकल्प उभारण्याचे त्यांचे उद्दिष्ट असून, राज्यातील अन्य गावांसाठीही हा प्रकल्प पथदर्शी ठरावा, अशी या जोडप्याची इच्छा आहे. (प्रतिनिधी)