विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने चार दिवसांत काढले ३७० जीआर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 10:26 AM2024-09-12T10:26:25+5:302024-09-12T10:26:50+5:30
विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात त्यामुळे सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहेत.
मुंबई - राज्य सरकारने केवळ चार दिवसांत कल्याणकारी योजना व विविध विभागांशी संबंधित तब्बल ३७० जीआर (शासनादेश) जारी केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांत जीआर काढण्याचा वेग वाढला आहे. महायुती सरकारने ४ ते ६ आणि ९ सप्टेंबर २०२४ या चार दिवसांत हे ३७० जीआर काढले आहेत.
दहामहा जारी झालेले
जानेवारी १,६४३
फेब्रुवारी २,०४९
मार्च ३,५९७
एप्रिल ३५९
मे ३६९
जून ७३४
जुलै १५७६
ऑगस्ट २,००१
खातेनिहाय जीआर
ग्रामीण विकास १०३
महसूल ५३
पर्यटन व सांस्कृतिक व्यवहार २९
सार्वजनिक कामे २७
सार्वजनिक आरोग्य २६
शालेय शिक्षण २२
उच्च व तांत्रिक शिक्षण २०
कृषी १६
सिंचन १४