अहमदनगर - मुलींवरील अत्याचाराचे सत्र सुरुच

By admin | Published: October 21, 2016 07:47 PM2016-10-21T19:47:43+5:302016-10-21T19:47:43+5:30

कोपर्डीची घटना ताजी असतानाच कर्जतच्या आक्काबाईनगरमधील अल्पवयीन शाळकरी मुलीवर गुरुवारी लैंगिक अत्याचाराची आणखी एक घटना घडली.

Ahmadnagar - The session of the crime against girls has been started | अहमदनगर - मुलींवरील अत्याचाराचे सत्र सुरुच

अहमदनगर - मुलींवरील अत्याचाराचे सत्र सुरुच

Next

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २१: कोपर्डीची घटना ताजी असतानाच कर्जतच्या आक्काबाईनगरमधील अल्पवयीन शाळकरी मुलीवर गुरुवारी लैंगिक अत्याचाराची आणखी एक घटना घडली. घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कर्जत बंद ठेवून मोर्चा काढण्यात आला. तसेच रास्ता रोको करण्यात आला. कर्जत येथे बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कर्जत मध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आठ वर्षे वयाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी ग्रामस्थांनी अत्याचार करणाऱ्या शिवा मल्हारी रंधवे या युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरूद्ध गुरुवारी रात्री उशिरा कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रात्री कर्जत पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी होती. अत्याचार करणाऱ्या आरोपीस कर्जत पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली. कोपर्डीची घटना ताजी असतानाच कर्जत येथे पुन्हा एका मुलीवर अत्याचार झाल्याने कर्जतमध्ये मोठा संताप निर्माण झाला. घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कर्जतमध्ये कडकडीत बंद पाळला. भाडेवाडी येथूनन मोर्चा काढून कर्जत - मिरजगाव मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. आरोपीला सहा महिन्यात कडक शिक्षा करावी, कर्जत शहर व उपनगरातील रोडरोमिओंचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा, आक्काबाईनगर येथील आरोपीच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, बसस्थानक परिसरात तसेच आक्काबाईनगर विद्यालयाच्या परिसरातील रोडरोमिओंचा वाढता त्रास रोखण्यासाठी पोलीस व प्रशासनाने पावले उचलावीत अशा मागण्या यावेळी मान्यवरांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना मांडल्या.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन मुंडे व तहसीलदार किरण सावंत यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात सकल मराठा समाज तसेच सावता माळी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, उपनगराध्यक्ष सोमनाथ कुलथे, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे, शिवसेनेचे शहरप्रमुख गणेश क्षीरसागर,राहुल नवले, अक्षय राऊत, भाजपचे शहराध्यक्ष रामदास हजारे, नितीन तोरडमल,संतोष धुमाळ, अनिल गदादे, सचिन सोनमाळी, अजित अनारसे,संतोष म्हेत्रे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Ahmadnagar - The session of the crime against girls has been started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.