एअर इंडियाचे लंडनमार्गे अहमदाबाद-नेवार्क
By admin | Published: July 22, 2016 04:05 AM2016-07-22T04:05:59+5:302016-07-22T04:05:59+5:30
प्रवासी वाहतूक करणाऱ्या एअर इंडियाने अहमदाबाद आणि नेवार्क (न्यू जर्सी) या दोन ठिकाणांना लंडनमार्गे जोडणाऱ्या विमानसेवेची घोषणा केली
मुंबई : प्रवासी वाहतूक करणाऱ्या एअर इंडियाने अहमदाबाद आणि नेवार्क (न्यू जर्सी) या दोन ठिकाणांना लंडनमार्गे जोडणाऱ्या विमानसेवेची घोषणा केली आहे. ही सेवा १५ आॅगस्ट २०१६पासून सुरू होईल.
एआय १७१ हे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता सुटेल. १० सप्टेंबर, २०१६पर्यंत या विमानातून प्रवास करणाऱ्यांना तिकिटात खास सवलत जाहीर करण्यात आली आहे. या विमानसेवेमुळे अहमदाबादमधल्या तब्बल ६ लाख जणांची सोय होणार आहे.
या सेवेसाठी बी-७८७ ड्रीमलायनर
एअरक्राफ्ट वापरले जाईल, जे अहमदाबादवरून
सकाळी ५.३० ला सुटेल आणि १०.१५ वाजता लंडनला पोहोचेल. नेवार्ककडील पुढल्या प्रवासासाठी लंडनहून हे विमान १२.३० वाजता सुटेल आणि १५.०० वाजता नेवार्कला पोहोचेल. परतीचे विमान एआय-१७२ नेवार्कहून २२.३० ला सुटेल आणि १०:१५ (+१) वाजता लंडनला पोहोचेल. लंडनहून हे विमान १२.३०
वाजता सुटून अहमदाबादला ते ०२.०० (+२) वाजता पोहोचेल. (प्रतिनिधी)