कृषी योजना राबविण्यात अहमदनगर सरस; नाशिक जिल्हा राज्यात दुसरा तर सोलापूर तिसरा
By Appasaheb.patil | Published: July 16, 2022 10:08 AM2022-07-16T10:08:50+5:302022-07-16T10:09:22+5:30
शेतकऱ्यांसाठी कृषी यांञिकीकरण योजनेतुन संरक्षित शेती, कांदाचाळ, शेततळे अस्तरीकरण, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर औजारे, पाईपलाईन, स्प्रे पंप व इतर योजनांसाठी हा खर्च करण्यात आला आहे.
सोलापूर: कृषी खात्याच्या योजना प्रभावीपणे राबवून निधी खर्च करण्यात सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा तर अहमदनगर प्रथम तर नाशिक जिल्हा राज्यात दुसर्या क्रमांकावर आहेत. अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा १३८ कोटी ८४ लाख ९४ हजार ३७४ रुपये इतका निधी विविध योजनासाठी खर्च झाला आहे.
मागील वर्षभरात कोरोणा'चा कालावधी असतानाही शेती आणी शेतकर्यांसाठी योजना राबविल्यानेच सर्वाधिक निधी खर्च करुन अहमदनगर, नाशिक व सोलापूर जिल्हे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधीक १३८ कोटी ८४ लाख ९४ हजार ३७४ रुपये इतका निधी खर्च केला आहे. त्या नंतर नाशिक जिल्ह्यात १०७ कोटी ३७ लाख ३२ हजार ४९२ रुपये तर १०३ कोटी ८६ लाख ३३ हजार ३३० रुपये सोलापूर जिल्ह्याने खर्च केला आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजना
शेतकऱ्यांसाठी कृषी यांञिकीकरण योजनेतुन संरक्षित शेती, कांदाचाळ, शेततळे अस्तरीकरण, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर औजारे, पाईपलाईन, स्प्रे पंप व इतर योजनांसाठी हा खर्च करण्यात आला आहे. ९० कोटी २६ लाख खर्च करुन बुलढाणा जिल्हा राज्यात चौथा, ७८ कोटी ७७ लाख खर्च करुन जळगाव पाचव्या क्रमांकावर आहे. ६४ कोटी २५ लाख रुपये खर्च करणारा पुणे जिल्हा ६ व्या, ६० कोटी ३० लाख खर्च करणारा औरंगाबाद जिल्हा सातवा, ५४ कोटी १२ लाख खर्च करुन सांगली जिल्हा ७ वा तर उस्मानाबाद जिल्हाने ५१ कोटी ८२ लाख रुपये विविध योजनांसाठी खर्च करुन राज्यात आठव्या क्रमांकावर आहे. राज्यातील इतर जिल्हाने ४ ते ५० कोटी पर्यंत खर्च केला आहे.
लॉटरीतून लाभार्थी निवड...
- विविध योजनांसाठी लाॅटरीत निवड झालेल्या २३ लाख ४ हजार ६८२ इतक्या लाभार्थ्यांपैकी तपासणीत १२ लाख ११ हजार ६१९ प्रस्ताव रद्द झाले. निवड झालेल्यांपैकी ६५ हजार ७५२ लाभार्थ्यांची नावे पुन्हा रद्द करण्यात आली.
- पाञ १० लाख २७ हजार ३११ लाभार्थ्यांपैकी ६ लाख २६ हजार लाभार्थ्यांनी कागदपञ सादर केली. खरेदी करण्यास परवानगी दिलेल्यापैकी ४ लाख ५२ हजार ४६० शेतकर्यांनी वस्तु खरेदी केल्याने एकुण १४३७ कोटी ३७ लाख ८९ हजार ६७२ रुपये खर्च झाला आहे.