अहमदनगर : पाइपलाइन फुटल्याने रेल्वे ट्रॅक खचला, वाहतूक ठप्प

By Admin | Published: June 18, 2016 11:55 AM2016-06-18T11:55:18+5:302016-06-18T12:04:07+5:30

मुळा धरणातून नगर एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन नगर तालुक्यातील विळदजवळ फुटल्याने रेल्वे ट्रॅक खचून वाहतूक ठप्प झाली.

Ahmednagar: The rail track collapsed due to the pipeline, traffic jam | अहमदनगर : पाइपलाइन फुटल्याने रेल्वे ट्रॅक खचला, वाहतूक ठप्प

अहमदनगर : पाइपलाइन फुटल्याने रेल्वे ट्रॅक खचला, वाहतूक ठप्प

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. १८ -  मुळा धरणातून नगर एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन नगर तालुक्यातील विळद जवळ फुटल्याने या पाइपलाइनजवळून जाणारा रेल्वे ट्रॅकही खचला आहे़. त्यामुळे रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली आहे.
एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन विळद येथे शनिवारी सकाळी फुटली़. पाइपलाइनचे पाणी रेल्वे रुळावरुन वाहू लागल्याने हा रेल्वे रुळ खचला.  रेल्वे रुळ खचल्याचे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात येताच मनमाडकडून येणारी रेल्वे थांबविण्यात आल्याचे सांगण्यात येत आले असून पाइपलाइन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे. तसेच  हे पाणी परिसरातील शेतात साचले असून, दोन्ही बाजूंचे ओढेही भरुन वाहत आहेत़. हे पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली. नगर-मनमाड राज्यमार्गावर बघ्याची गर्दी वाढल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली़.

 

Web Title: Ahmednagar: The rail track collapsed due to the pipeline, traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.